
Sports कट्टा
507 episodes — Page 5 of 11

Harbhajan vs Sreesanth 'SLAPGATE' Controversy
पहिल्या-वाहिल्या इंडियन प्रीमियर लीगमधील पहिला-वहिला वादंग. तोही भारताच्या २ सुपरस्टार्समध्ये. तेदेखील मैदानावर एकानी दुसऱ्यावर हात उगारून. नक्की काय झालं ज्यामुळे हरभजन सिंगने श्रीसांथच्या मुस्काटात मारली? आणि त्याच्यामुळे भारतीय क्रिकेटविश्व किती बदललं? भारतीय क्रिकेट बोर्डाने - BCCI ने - का आणि काय कारवाई केली? त्या घटनेचा मोहालीत साक्षीदार असलेला आणि IPL इतिहासातील पहिली 'कॉंट्रोव्हर्सी' वार्तांकित केलेला क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर सांगत आहे २००८ च्या त्या वादग्रस्त घटनाक्रमांबद्दल It happened during the inaugural edition of the Indian Premier League. And it was the first of the many controversies that have become an integral part of the IPL phenomenon. But with two India superstars involved in it - and one of them had allegedly slapped the other - the Slapgate remains one the biggest blots on the IPL. What exactly led Harbhajan Singh to wage a physical assault on S Sreesanth? And how did the Indian cricket board - the BCCI - react to it? Having been a witness to that night's events in Mohali in 2008 and reported on its aftermath, sports journalist Amol Karhadkar reveals some of the lesser-known facts of the episode

Sourav Ganguly vs Virat Kohli, Nitish Rana vs Hrithik Shokeen
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणीनुसार संघामध्ये १५ खेळाडू असताना प्रत्येकाचं सगळ्यांशी पटेलच असं नाही. पण जमवून घेणं प्रत्येकाचं काम आहे. गेल्या आठवड्यात IPL मध्ये सौरव गांगुली-विराट कोहली आणि नितिश राणा-रितिक शोकिनमध्ये जे घडलं त्यावरून खेळाडूंमध्ये किती खुन्नस असते याची झलक बघायला मिळाली. त्याचप्रमाणे दिल्ली कॅपिटल्स स्पर्धा अजून ४० दिवस शिल्लक असतानाच पुढच्या सीझनकडे डोळे लावून बसले असावेत असं वाटू लागलं आहे. हे आणि गेल्या आठवड्यातल्या घडामोडी घेऊन येत आहेत साप्ताहिक सीसीबीकेमध्ये अमोल क-हाडकर आणि आदित्य जोशी.

का केले होते Shah Rukh Khan ला वानखेडे स्टेडियमवर ban?
इंडियन प्रीमियर लीग आणि वाद-विवाद हे जणू काही समानार्थी शब्द आहेत. IPL मधील आतापर्यंतचे सर्वाधिक चर्चेत असलेले विवाद सादर करताना पहिल्या भागात आम्ही निवड केली आहे मुंबईतील २०१२ मधील घटनेची जेव्हा शाहरुख खानवर मैदानावर हाणामारी केल्याच्या व अपशब्द वापरल्याच्या आरोपानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियमवर बंदी घातली होती.Indian Premier League is synonymous with controversies. While presenting the most talked-about controversies in the IPL so far, we start the series with the 2012 episode in Mumbai when Shah Rukh Khan, following a scuffle on the ground, was banned at the Wankhede Stadium by the Mumbai Cricket Association

Saaptahik CCBK, Rinku Singh चा प्रवास, Ajinkya Rahane चा नवा ध्यास
रिंकू सिंगने कोलकता नाईट रायडर्ससाठी गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या षटकात सलग पाच सिक्स मारून कमाल केली. आहे तरी कोण रिंकू सिंग? आणि त्याच्या कामगिरीमुळे KKR आणि प्रशिक्षक चंद्रकांत पंडित ह्या दोघांनाही सुटकेचा निःश्वास का बरं टाकला असावा? २०२३ ची IPL हि इन्जुअर्ड प्रीमियर लीग समजली जाईल? आणि अश्याच एका दुखापतीमुळे अजिंक्य रहाणेची T२० कारकीर्दीला नवे पंख फुटले आहेत? पाहूया 'साप्ताहिक CCBK' मध्ये आदित्य जोशी व अमोल कऱ्हाडकर यांची चर्चा Rinku Singh stole the limelight with five consecutive sixes off Yash Dayal's last five balls of the match to help Kolkata Knight Riders stun defending champions Gujarat Titans. Who is Rinku Singh? And why would his achievement have helped both KKR and head coach Chandrakant Pandit heave a sigh of relief? Will the 2023 IPL be considered the Injured Premier League? Has one such injury has given new wings to Ajinkya Rahane's T20 career? Over to Aditya Joshi and Amol Karhadkar in 'Saaptahik CCBK'

जेव्हा MS Dhoni ने माझ्यासाठी IPL मॅच-बॉल सही केला
IPLची मॅच हॉस्पिटॅलिटी बॉक्समधून सेलिब्रिटीसारखं बघता येणं, ते सुद्धा स्वत:च्या शहरात नाही तर थेट दुबईला विमानाने जाऊन. ती मॅचसुद्धा मुंबई-चेन्नई या आपयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली. मॅच संपल्यानंतर धोणीची प्रत्यक्ष भेट आणि त्याच्याकडून सही करून मिळालेला बॉल. सगळंच स्वप्नवत घडलं २०१४ मध्ये. त्याचीच अविस्मरणीय आठवण आपल्याला आदित्य जोशी त्याचा मित्र मनन भट बरोबर सांगत आहे. Watching the IPL match from hospitality box and getting signed match ball from none other than Mahendra Singh Dhoni can be only dreamt as a fan. But it became reality that too when IPL was held in Dubai. How did it happen and why we got two days fame everywhere is explained here by Aditya Joshi and his friend Manan Bhatt thanks to him this became reality.

Saaptahik CCBK, Mark Wood गाजवणार IPL 2023?
कोण वाटत आहे सर्वात बॅलन्स्ड संघ? पहिल्या सहा सामन्यांमधून सर्वात समतोल संघाचा अंदाज बांधता येईल? दक्षिण आफ्रिकेची फौज दाखल झाल्यावर कोणाला होईल सर्वात जास्त फायदा? रोहित शर्माची कामगिरी सुधारणं किती आवश्यक आहे? इम्पॅक्ट प्लेयर्समध्ये चेन्नई सुपर किंग्जचा 'कल्याण एक्स्प्रेस' तुषार देशपांडे सोडून अजून कोणी चमकलं आहे? आणि मार्क वूड होईल ह्या स्पर्धेचा स्टार? 'साप्ताहिक CCBK' मध्ये आदित्य जोशी व अमोल कऱ्हाडकर मारत आहेत गप्पा ह्या मुद्द्यांवर Is it too early to judge the most balanced outfit in IPL 2023? Who will benefit the most once the South African players join in later this week? How critical are Rohit Sharma and KL Rahul's forms for their respective teams? Besides Chennai Super Kings' Tushar Deshpande, has there been a stand-out impact on player performance so far? And will Mark Wood emerge as the X-factor of IPL 2023? Aditya Joshi and Amol Karhadkar discuss these aspects in 'Saaptahik CCBK'

CCBK Explainer, 5 Legends in IPL 2023
IPL मध्ये जसं अनेक नवीन खेळाडूंना आपलं टॅलेंट दाखवता येत, त्याचप्रमाणे नावाजलेल्या खेळाडूंना आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध करायची संधी मिळते. गेल्या IPL मध्ये हार्दिक पांड्याने ती संधी पुरेपुर साधली आणि टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून कमबॅक केलं. यावर्षीदेखील अनेक रथी महारथींचा कस लागणारे. कोण आहेत हे रथी-महारथी आणि काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून हे सांगत आहे आदित्य जोशी सीसीबीकेच्या या IPL विशेष भागात... IPL is said to be a sea of opportunities for young talent in India. In the same way, it helps established legends to show their utility in changing times. Hardik Pandya, last year grabbed the opportunity with both hands and made comeback as Team India Captain in the shortest format. IPL 2023 will test a lot of established players in some way or another. Let's see who they are and what to expect from them in this IPL. Aditya Joshi brings detailed analysis of all this in an IPL special…

CCBK Explainer, 5 Missing Stars in IPL 2023
IPL ही जगातील सर्वात श्रीमंत T२० स्पर्धा आहे. त्यामुळे अगदीच नाईलाज झाला तरंच खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ IPL मध्ये अनुपलब्ध असतात. इतर देशांच्या क्रिकेट नियामक मंडळांना सुद्धा त्यांचे खेळाडू IPLला पाठवण्याचे पैसे मिळतात. एकंदरीतच स्पर्धेतील सहभाग तुम्हाला मालामाल करतो. त्यामुळे करियर आणि आर्थिक स्थैर्य ह्यासाठी दृष्टिकोनातून स्पर्धा महत्त्वाची ठरते. असं असून देखील ह्या ना त्या कारणाने काही नावाजलेले खेळाडू यंदा मैदानावर दिसणार नाहीत. त्यामागची कारणं CCBK च्या विशेष भागात सांगत आहे अमोल कऱ्हाडकर... IPL is the richest and the most prestigious T20 league in the world. No player or even a support staff wants to give it a miss unless it’s unavoidable. Cricket boards across the world receive commissions to allow their players to play in the IPL. The league is important to players both financially and career growth-wise. However, some star players will be missing from the action for some reason or another. Amol Karhadkar picks who he will miss watching the most in this CCBK Explainer.

२००८ ते २०२३: IPL चा प्रवास, Part 2
इंडियन प्रीमियर लीगची १६ वी आवृत्तीच्या 'काउंटडाउन' चा भाग म्हणून CCBK ने नुकताच पुण्यात IPL च्या गप्पांचा कार्यक्रम - T२० लीगची टोलेबाजी - आयोजित केला होता. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले, CCBK चे खंदे पाठीराखे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांच्याशी क्रिकेट चाहते डॉ. गौतम गोवित्रीकर यांनी IPL च्या विविध कंगोऱ्यांवर संवाद साधला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी १३० पेक्षा अधिक प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान 'फाऊलप्ले क्विझिंग' चे सिद्धार्थ गोखले यांनी IPL शी निगडित प्रश्नमंजुषा घेतली. विजेत्या प्रेक्षकांना CCBK तर्फे बक्षिसे देण्यात आली. हा कार्यक्रम प्रायोजित केला होता: ड्रीम्स रिडेव्हलप्ड, आत्मभान व व्हिवोशिल्ड यांनी. As part of CCBK’s countdown to the 16th edition of the Indian Premier League, CCBK recently organized an IPL chat show - T20 Leaguechi Tolebaji - in Pune. Cricket enthusiast Dr. Gautam Govitrikar moderated the session, with veteran sports analyst Sunandan Lele and CCBK’s supporter sports journalist Amol Karhadkar opening up on aspects of IPL. More than 130 cricket fans attended the event in person. During the program, Siddharth Gokhale of 'Foulplay Quizzing' conducted a quiz related to IPL. Winners were handed prizes by CCBK.The event was sponsored by Dreams Redeveloped, Aatmabhan and Vivoshield.

२००८ ते २०२३: IPL चा प्रवास, Part 1
इंडियन प्रीमियर लीगची १६ वी आवृत्तीच्या 'काउंटडाउन' चा भाग म्हणून CCBK ने नुकताच पुण्यात IPL च्या गप्पांचा कार्यक्रम - T२० लीगची टोलेबाजी - आयोजित केला होता. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले, CCBK चे खंदे पाठीराखे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांच्याशी क्रिकेट चाहते डॉ. गौतम गोवित्रीकर यांनी IPL च्या विविध कंगोऱ्यांवर संवाद साधला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी १३० पेक्षा अधिक प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान 'फाऊलप्ले क्विझिंग' चे सिद्धार्थ गोखले यांनी IPL शी निगडित प्रश्नमंजुषा घेतली. विजेत्या प्रेक्षकांना CCBK तर्फे बक्षिसे देण्यात आली. हा कार्यक्रम प्रायोजित केला होता: ड्रीम्स रिडेव्हलप्ड, आत्मभान व व्हिवोशिल्ड यांनी. As part of CCBK’s countdown to the 16th edition of the Indian Premier League, CCBK recently organized an IPL chat show - T20 Leaguechi Tolebaji - in Pune. Cricket enthusiast Dr. Gautam Govitrikar moderated the session, with veteran sports analyst Sunandan Lele and CCBK’s supporter sports journalist Amol Karhadkar opening up on aspects of IPL. More than 130 cricket fans attended the event in person. During the program, Siddharth Gokhale of 'Foulplay Quizzing' conducted a quiz related to IPL. Winners were handed prizes by CCBK.The event was sponsored by Dreams Redeveloped, Aatmabhan and Vivoshield.

WPL ठरेल महिला क्रिकेटचा टर्निंग पॉईंट?
हरमनप्रीत कौरच्या संघाने मुंबई इंडियन्सला पहिलीवहिली WPL जिंकवून देऊन मुंबापुरीच्या क्लबला सातवी ट्रॉफी मिळवून दिली. मुंबई व दिल्ली कॅपिटल्समधील उत्कंठावर्धक अंतिम सामन्यापलीकडे जाऊन समजून घेऊया पहिल्या WPL हंगामाचे महत्त्व. अमोल कऱ्हाडकर व एस. सुदर्शनन मारत आहेत गप्पा क्रिकेटच्या गुणवत्तेबद्दल, प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल, RCB च्या अपयशाबद्दल व पुढील वर्षी होऊ शकणाऱ्या सुधारणांबद्दलHarmanpreet Kaur's girls helped Mumbai Indians to their maiden WPL win, giving the Mumbai club their seventh trophy. We try and look beyond the thrilling final between Mumbai and Delhi Capitals to try and understand the significance of the first WPL season. Amol Karhadkar and S. Sudarshanan discuss the quality of cricket, audience response, RCB's failures, and possible improvements next year.

Domestic uncapped players to watch out for in IPL 2023
रथी-महारथी जेवढे महत्त्वाचे असतात तेवढेच देशांतर्गत क्रिकेटमधील भारतीय खेळाडू IPL मधील यशस्वी संघांसाठी निर्णायक ठरू शकतात. आदित्य जोशी सांगत आहे ५ 'अनकॅप्ड' खेळाडूंबद्दल ज्यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल IPL २०२३ मध्ये Indian domestic cricketers play as critical role as the stalwarts for a team's success in the Indian Premier League. Aditya Joshi profiles five domestic uncapped cricketers to watch out for in IPL 2023

Impact Player म्हणजे काय रे भाऊ...
आयपीएल २०२३ मध्ये बीसीसीआयने इंपॅक्ट प्लेअरचा नियम आणला आहे. नक्की कसा वापर करू शकतील संघ या नवीन नियमाचा? कसा ठरू शकेल हा गेमचेंजर आयपीएलसाठी. त्याशिवाय प्रथमच आयपीएल होणारे ईशान्य भारतामध्ये. का निवडलं आहे राजस्थान रॉयल्सने दूरचं मैदान? ही आणि अशीच अजून ३ आयपीएल २०२३ ची वैशिष्ट्ये घेऊन तुमच्या समोर येत आहेत आदित्या जोशी आणि अमोल क-हाडकर

पुन्हा भेडसावणार भारताला No. ४ चा प्रश्न? कोण होणार WPL विजेता?
ऑस्ट्रेलियाचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे, परंतु ४ वर्षांमधील घरच्या मैदानावरील पहिल्या मालिकेतील पराभव ही भारताला वर्ल्ड कपआधी चपराक आहे? भारताच्या पराभवाचं खापर फक्त सूर्यकुमार यादवच्या अपयशावर फोडणं योग्य आहे? आली आहे वेळ पुन्हा एकदा संजू सॅम्सनला संधी देण्याची? आणि पहिल्यावाहिल्या WPL च्या साखळी फेरीनंतर काय आहेत चर्चेतील मुद्दे? सांगत आहे अमोल कऱ्हाडकर 'साप्ताहिक CCBK' मध्ये One cannot stop praising Australia, but is India's first series loss at home in four years a slap in the face ahead of the World Cup? Is it right to blame only Suryakumar Yadav for India's failure? Is it time to give Sanju Samson another chance in ODIs? And what are the talking points after the league stage of the WPL? Over to Amol Karhadkar in 'Saaptahik CCBK'

Ruturaj Gaikwad ते Rohit Sharma; Jitesh Sharma ते Prithvi Shaw: कोणता मराठी खेळाडू तोडणार IPL २०२३?
मराठी नववर्षाच्या सुरुवातीचा मुहूर्त पाहून सुरु करूया 'थोडा हटके' असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 'काउंटडाउन' ची. १० संघ, आधीचे विजेते, ह्या वर्षीचे फेव्हरिट्स वगैरे गोष्टींमध्ये न जाता जाणून घेऊया IPL २०२३ मध्ये दिसणाऱ्या २५ मराठी-भाषिक खेळाडूंबद्दल. हा एपिसोड रेकॉर्ड करताना आदित्य जोशी व अमोल कऱ्हाडकरला फार मजा आली. आशा आहे तुम्हालाही येईल. Let's start CCBK's different IPL countdown on the auspicious day of Gudhi Padwa, the Marathi New Year! Rather than discussing routine stuff like the title favorites or Orange Cap and Purple Cap contenders, Aditya Joshi and Amol Karhadkar discuss the 25 Marathi-speaking cricketers who will feature in IPL 2023. We had a blast while recording this episode. Hopefully, you'll thoroughly enjoy listening to it.

Saaptahik CCBK, Border Gavaskar Trophy series review, ft. Sunandan Lele
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताने २-१ जिंकली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा एकदा गाठ पक्की केली. कोहलीने एका 'विराट' खेळीने टीकाकारांची बोलती बंद केली खरी, पण शुबमन गिलने ज्या पद्धतीने शतक झळकावलं त्यावरून भारतीय संघाचं भविष्य सुरक्षित हातात आहे, ह्याची खात्री नक्की पटवून दिली? आणि भविष्याचा विचार करताना, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, कोहली, स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, मिचेल स्टार्क ह्या सारख्या 'दादा' खेळाडूंची ही भारतातील शेवटची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ठरेल? रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा आणि नेथन लायन ह्या फिरकी गोलंदाजांपैकी जास्त छाप कोणी सोडली मालिकेवर? 'साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर घेत आहेत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा मागोवाIndia bagged the Border-Gavaskar Trophy with the 2-1 series win and ensured another meeting with Australia in the World Test Championships final at the Oval in June. Was it this 'innings' that Virat Kohli needed to regain his Midas touch? Is the future of Indian batting safe in the hands of Shubman Gill? Will this prove to be the final Border-Gavaskar Trophy for the likes of Rohit Sharma, Cheteshwar Pujara, Kohli, Steve Smith, David Warner and Mitchell Starc? Who do you reckon was the most impressive spinner? Was it R Ashwin or Ravindra Jadeja or Nathan Lyon? Sunandan Lele and Amol Karhadkar review the series in 'Saaptahik CCBK'

आखाडे बनवून Team India नक्की काय साध्य करते?
पुणे २०१७ ची पुनरावृत्ती इंदोरमध्ये झाली. ह्या दारुण पराभवाला नक्की जबाबदार कोण? काय साध्य होतं भारतात वारंवार आखाडे बनवून? अहमदाबाद कसोटीत काय बदल घडू शकतात? आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचायची अजूनही भारताला संधी आहे? पाहूया 'साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकरची चर्चा Pune 2017 was repeated in Indore last week. Who should be held responsible for India's terrible defeat in the third Test versus Australia? What exactly is achieved by preparing rank turners repeatedly in India? Will it have any bearing on India's combination for the series decider in Ahmedabad? And does India still have a chance to reach the final of the World Test Championship? Let's hear it from Sunandan Lele and Amol Karhadkar in 'Saaptahik CCBK'

CCBK Saaptahik, कोहली-पुजारा यांना गवसेल का सूर ?
ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी T२० विश्वचषक अपेक्षेप्रमाणे पटकावला. फिटनेस, क्षेत्ररक्षण आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी सलग तिसरा आणि एकूण सहावा विश्वचषक जिंकला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे पुरूष मात्र कसोटी सामना पाच दिवस तरी चालवू शकणार का हा प्रश्न आहे. पॅट कमिन्सच्या जागी नेतृत्त्व करणारा स्टीव्ह स्मिथ करू शकेल का काही चमत्कार ? कॅमरून ग्रीन आणि स्टार्क पहिल्यांदाच दिसतील का मालिकेमध्ये ? आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका केएल राहुल खेळेल का या सामन्यामध्ये.. या सगळ्या प्रश्नांची चर्चा करत आहेत साप्ताहिक सीसीबीकेमध्ये अमोल क-हाडकर आणि हा सामना कव्हर करायला गेलेले सुनंदन लेले.

Harmanpreet च्या run-out मुळे? का खराब fielding मुळे? का संपलं भारताचं आव्हान
हरमनप्रीत कौरने आजारपणातून सावरून बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा एकदा आश्चर्यचकित करणारी खेळी खेळली. तरीही भारताच्या उपांत्य फेरीतील पराभवाचं खापर भारतीय महिला संघाच्या कर्णधाराच्या रन-आऊटवर फोडायचं का? का भारताची अतिसामान्य फिल्डिंग त्यांच्या T२० वर्ल्ड कपमधील 'एक्झिट' ला जबाबदार ठरला? उपांत्य सामना व भारताची स्पर्धा ह्यावर प्रकाश टाकत आहे जुईली बल्लाळ Despite being sick, Harmanpreet Kaur played yet another sensational innings that almost stunned Australia in the T20 World Cup semifinal. Still, should India's semifinal defeat be blamed on the captain's run-out? Or was India's mediocre fielding responsible for their T20 World Cup exit? Juili Ballal sheds light on the semifinal and India's campaign

Australians ना त्यांच्याच भाषेत धडा शिकवणारा Virat Kohli
जे तेंडुलकर, द्रविड, कुंबळे, लक्ष्मण, सेहवाग आणि धोनी अश्या दिग्गजांना जमलं नाही, ते विराट कोहलीच्या भारतीय संघाने करून दाखवलं. २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला. त्याही आधीपासून, म्हणजे २०१२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून, कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही स्पर्धा सुरू झाली. प्रतिस्पर्ध्याच्या डोळ्यात डोळे घालून, शाब्दिक बाचाबाची करणारा आणि २०१४-१५ दौऱ्यात धावांचा डोंगर उभारणारा कोहली ऑस्ट्रेलियन चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला. कांगारू देशातील कोहली-पर्व उलगडत आहे गौरव जोशी ह्या भागातVirat Kohli's Cavaliers earned the distinction of winning a historic Test series in Australia in 2018-19. At the start of the decade, however, Virat Kohli's love-hate relationship had begun Down Under. From giving it back to the crowd, to sledge Australians in their own territory to dominating the 2014-15 series with his willow, Kohli earned the respect of Australian fans. Gaurav Joshi traces the Virat Kohli era versus Australia in this episode

मराठीत rapid-fire with Smriti Mandhana
सांगली का साऊथॅम्प्टन? सांगलीतील एक गोष्ट जी जगात कुठेही घेऊन जायला आवडेल? "माझं आडनाव मंधाना नव्हे, मानधना आहे," हे शेवटचं कधी सांगितलं? ह्या आणि अजून काही प्रश्नांची उत्तरं देत आहे खुद्द स्मृती मानधना, तेही आपल्या मराठीत. Sangli or Southampton? One thing from Sangli that you would love to carry everywhere in the world? When was the last time you corrected someone for having mispronounced your surname? We caught hold of Smriti Mandhana to respond to a rapid-fire, that too in Marathi.

Ashwin, Jadeja ने केला Australia चा 'स्वीप'डा साफ, ft Sunandan Lele
सलग दुसरा सामना तिसऱ्या दिवशी खिशात टाकून भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या अंतिम सामन्यात एक पाऊ तर टाकलेच आहे, परंतु ऑस्ट्रेलिया फिरकी गोलंदाजीसमोरील किती कमकुवत आहे हे सुद्धा सिद्ध केले आहे. पहिल्या सामन्यापेक्षा दुसरा पराभव जास्त जिव्हारी लागेल ऑस्ट्रेलियाच्या? आणि अश्विन, जाडेजा आणि अक्षर ह्या त्रयीला कोण रोखू शकेल? त्याचबरोबर आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर भारत देईल केएल राहुलला विश्रांती? ह्या सर्व मुद्द्यांवर गप्पा मारायला आपल्याबरोबर आहेत थेट दिल्लीहून सुनंदन लेले By pocketing the second match in a row on the third day, India have not virtually assured themselves a place in the final of the World Test Championship but have also exposed Australia's frailty against quality spin. Will Australia sulk for the loss in the second Test than the series-opener? And can anyone stop the trio of Ashwin, Jadeja and Axar? Besides, Will India rest (read drop) KL Rahul in Indore after a week's rest? Let's discuss all the issues with Sunandan Lele who joins us from the Arun Jaitley Stadium in New Delhi

Devika Vaidya ला वगळणं पडलं भारताला महागात?
भारताच्या महिलांनी पुन्हा एकदा इंग्लंडसमोर नांगी टाकल्याने T२० वर्ल्ड कप पहिल्यांदा जिंकण्याचे स्वप्न भंगू शकतं? काय करावे लागेल भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी? आणि देविका वैद्यच्या जागी शिखा पांडेला खेळवणं भारताला महागात पडलं इंग्लडविरुद्ध? पाहूया जुईली बल्लाळचं विश्लेषण Has India's defeat against England, its bogey team in the Women's T20 World Cup, dealt a severe blow to Harmanpreet Kaur and Co's dream of winning its maiden T20 World Cup title? Can India still make it to the semi-finals? Did playing Shikha Pandey in place of Devika Vaidya cost India against England? Juili Ballal breaks down India's loss against England

Harbhajan vs Symonds: का करावी लागली India व Australia च्या Prime Ministers ना मध्यस्थी?
२००७-०८ भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका ही क्रिकेटपेक्षा 'मंकीगेट' प्रकरणामुळे अधिक गाजली. हरभजन सिंगने अँड्रयू सायमंड्सला माकड म्हणून चिडवले असा आरोप करण्यात आला. या आरोपाला रेसिझमची किनार असल्याने वातावरण अधिकच बिघडलं. केवळ एकच संघ मैदानावर चांगल्या स्पिरिटने उतरला, असा धक्कादायक शेरा भारतीय कर्णधार अनिल कुंबळेने मारला होता. सिडनीमध्ये झालेल्या कसोटीत भारताचा पराभव झाला. पुढे कसोटी मालिका रद्द होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण शेवटी मध्यस्थी झाली आणि भारताने पर्थमध्ये संस्मरणीय विजय मिळवला. गौरव जोशी आपल्याला ही मालिका आणि त्यांनतर भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांतील तणावाबद्दल माहिती देत आहे.The 2007-08 India-Australia Test series is more famous for the 'Monkeygate' controversy than cricket. It was alleged that Harbhajan Singh teased Andrew Symonds as a monkey. Since it was a racial charge, the teams had a go at each other in the following Test on multiple occasions. India captain Anil Kumble made a shocking remark that only one team played in the spirit of the game. after India lost the Sydney Test. At one point, India was on the verge of abandoning the tour and returning home. But thanks to the mediation from the highest echelons of power, the series continued and India went on to register a memorable victory in Perth. Gaurav Joshi recounts the series and the tensions in India-Australia relations.

CCBK Special, Cheteshwar Pujara ची स्पेशल शंभरी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यानंतर तब्बल एक तपानंतर चेतेश्वर पुजारा शंभर कसोटी सामने खेळणारा भारताचा १३ वा खेळाडू व्हायच्या उंबरठ्यावर आहेच. त्याचे मैदानातील वर कारकिर्दीतील चढ-उतार तुम्हाला माहीत आहेतच, परंतु त्याच्या राजकोटमधून सुरु झालेल्या प्रवासातील काही रंजक आठवणी सांगत आहे अमोल कऱ्हाडकर 'CCBK स्पेशल' मध्ये More than 12 year since making his Test debut against Australia, Cheteshwar Pujara is on the verge of becoming India's 13th cricketer to play 100 Tests. You may have followed the ups and downs in his career , but Amol Karhadkar in 'CCBK Special' shares some interesting tales about his journey that started in Rajkot.

CCBK Explainer, Sting operation नंतर राहतील Chetan Sharma chief selector?
भारतीय पुरुष संघाचे निवड समिती प्रमुख चेतन शर्मा ह्यांचं 'स्टिंग ऑपरेशन' करून नक्की काय साध्य झालं आहे? आणि त्याचे पडसाद त्यांच्या हकालपट्टीमध्ये उमटतील? त्यांनी केलेले दावे आणि त्याची पार्श्वभूमी सांगत आहे आदित्य जोशी 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये What exactly has been achieved by the 'sting operation' of Indian men's selection committee chief Chetan Sharma? And will its repercussions see Chetan Sharma being sacked? Aditya Joshi explains Sharma's claims and background in 'CCBK Explainer'

Pakistan विरुद्ध विजयात भारताने केले Smriti Mandhana ला miss, WPL Auction मध्ये सांगलीची स्मृती झाली hit
दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या वर्ल्ड कपची सुरूवात भारताने पाकिस्तानचा पराभव करत जोरदार केली. जेमायमा रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि राधा यादव यांनी मौल्यवान कामगिरी केली. या सामन्यानंतर काहीच तासांत WPL चे पहिलेवहिले ऑक्शन पार पडले. स्मृती मानधना ३.४० कोटींच्या बोलीसह सर्वाधिक महागडी खेळाडू ठरली. अनेक महिला क्रिकेटपटूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे केली. भारत-पाकिस्तान सामना आणि ऑक्शन याची थोडक्यात माहिती देण्यासाठी CCBK वर आज एंट्री होत आहे जुईली बल्लाळ या मुंबईच्या माजी क्रिकेटपटूचीIndia's women started their T20 World clCup campaign in South Africa with a facile win, thanks to Jemimah Rodrigues, Richa Ghosh and Radha Yadav's sterling show. Even before the euphoria of the win was to die down, the women cricketers continued to hog the limelight during the maiden WPL Auction. Smriti Mandhana became most expensive player of auction, being signed for a whopping Rs 3.40 crore by Royal Challengers Banglore. Juili Ballal, former Mumbai cricketer, makes her CCBK debut with a lowdown over the happening two days' action, on and off the field.

Rohit Sharma, R Ashwin आणि Ravindra Jadeja ने रचला नागपूरात इतिहास
कर्णधार रोहित शर्माचे शानदार शतकाने पाय रचला व अष्टपैलू फिरकी गोलंदाजांच्या त्रिकुटाने त्यावर कळस चढवला. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा अवघ्या अडीच दिवसांत धुव्वा उडवला. ह्या सामन्याचा 'आँखो देखा हाल' देत आहेत थेट जामठ्यावरून सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर Captain Rohit Sharma's brilliant century laid the foundation and the trio of all-round spinners topped it off. As a result, India decimated Australia in just two and a half days in the opening Test of the Border-Gavaskar Trophy. Sunandan Lele and Amol Karhadkar present you the review of the game straight from the VCA Stadium, Jamtha

लक्ष्मण-द्रविडच्या भागीदारीने केला चमत्कार
भारतीय क्रिकेट नुकतंच कुठे मॅच फिक्सींगच्या तडाख्यातून सावरत होतं. अशावेळी इतिहासातील सर्वोत्तम असा ऑस्ट्रेलियन संघ स्टीव वॉच्या नेतृत्त्वाखाली भारतात कसोटी मालिका जिंकण्याच्या इर्षेने आला होता. सलग १५ कसोटी जिंकलेला आणि मॅग्रा-शेन वॉर्न ताफ्यात असलेला ऑस्ट्रेलियाला हरवणं म्हणजे चमत्कार होता. पहिली कसोटी सहज खिशात टाकून दुस-या कसोटीतही तिस-या दिवशी भारताला फॉलॉओन मिळाला. त्यानंतर जे घडलं त्याने ती मालिका आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अजरामर झाली. लक्ष्मण आणि द्रविडची ३७६ धावांची भागीदारी आणि हरभजनच्या १३ विकेट्सने भारताने इतिहासातील कदाचित सर्वोत्तम कसोटी जिंकली. ती मालिका आणि नंतरचा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा प्रवास सांगत आहेत गौरव जोशी सीसीबीकेसाठी गॅवचा गुरूवारमध्येAustralia had become an unbeatable side under Steve Waugh, with two of the world's best bowlers in their arsenal, Glenn McGrath and Shane Warne. The Australian juggernaut arrived in India with a 15-match winning streak, a world record. After losing the first Test in Mumbai, there was immense pressure on the young Indian side led by Sourav Ganguly and then came the historic Kolkata Test, which changed the course of Indian cricket. This Kolkata match went on for five days, had plenty of twists and turns. It will always be remembered for India's marvelous fightback, thanks to a great partnership of 376 between VVS Laxman and Rahul Dravid. With Harbhajan Singh whirling his way to 13 wickets in a thrilling and decisive performance. Gaurav Joshi from CCBK telling us about this memorable series and following BGT’s.

जिंकू शकेल Harmanpreet & Co. भारताचा पहिला Women's World Cup?
क्रिकेटमध्ये मंदिरा बेदीची एंट्री २००३ साली दक्षिण आफ्रिकेमधील वर्ल्ड कपच्या वेळी झाली. तेव्हा पुरुषांच्या खेळामध्ये महिला कशाला, अशी बोंबाबोंब झाली होती. गेल्या २० वर्षांत महिला क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रगती आणि सुधारणा झाली आहे. महिलांची प्रिमिअर लीग पुढच्या महिन्यात आहे आणि आत्ता दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय महिला आपला पहिला वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न बघत आहेत. हरमनप्रीत आणि कंपनीला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडचं कडवं आव्हान असणार आहे. या स्पर्धेची माहिती आणि भारताला असलेल्या संधीबद्दल जाणून घेऊया संदीप जगे यांच्याकडून When Mandira Bedi made her entry into cricket broadcast during the World Cup in South Africa in 2003, there wa hue and cry over a woman's foray in men's sport. Over the last two decades, women's cricket has improved leaps and bounds. Even before the next month's inaugural edition of the Women's Premier League, India's women are dreaming of winning their first World Cup in South Africa. Harmanpreet and Co. will have a tough challenge from Australia, England and New Zealand. Let's know more about the Women's World Cup and India's chances in this episode, presented by Sandeep Jage.

Saaptahik CCBK, Rohit Sharma or Pat Cummins? Who will lift the Border-Gavaskar Trophy?
११ महिन्यांनंतर होणार भारतात कसोटी मालिका. ती देखील बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध. आणि त्याहून मोठे म्हणजे सहा व नंतर ऑस्ट्रेलिया खेळणार आहे भारतात. हे तर काहीच नाही, ह्या कसोटी मालिकेच्या निकालावर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचणार की नाही, हेही ठरणार आहे. अजून काय हवं आहे मालिकेची उत्कंठा वाढवायला? जे काही हवं आहे ते सादर करत आहेत गौरव जोशी, आदित्य जोशी आणि अमोल कऱ्हाडकर "साप्ताहिक CCBK" च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पूर्वावलोकनामध्येIndia will host a Test match after 11 months. That too against the mighty Australia. Add to it the fact that Australia is touring India for a Test series after six years. That's not all! The result of the four-match series will also decide whether India makes it to the final of the World Test Championship. Do you need anything else to build up your excitement for the Border-Gavaskar Trophy? Here's everything that you need ahead of the series-opener, courtesy "Saaptahik CCBK" presented by Gaurav Joshi, Aditya Joshi and Amol Karhadkar.

Meet Sayali Naik: Delhi Capitals' dietitian and Suryakumar Yadav's nutritionist
२०११ वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्याआधी दोन दिवस सचिन तेंडुलकर फक्त दही-भात खात होता. विराट कोहली जेवताना प्रत्येक गोष्ट मोजून मापूनच घेतो; पाणी सुद्धा ठरवून दिलेलं असतं, तेवढंच घेतो. या गोष्टी ते काटेकोरपणे पाळतात त्यांच्या आहारतज्ञाच्या सांगण्यावरून. आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींना क्रीडापटूच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. "पडद्यामागील शिलेदार" चा भाग हा पैलू उलगडून दाखवण्यासाठी आहे. आघाडीच्या क्रीडा आहारतज्ञ सायली नाईक, ज्यांनी अनेक क्रीडापटू, प्रथम श्रेणी क्रिकेटपटू, सूर्यकुमार यादवसारखा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आणि आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्ससह काम केल्याने ह्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी सायलीपेक्षा चांगला तज्ञ क्वचितच मिळेल.At a time when the whole sports ecosystem is being more aware about the nutritional aspect, cricketers are leading the pack. In "Padadyamageel Shiledaar", let's meet leading sports nutritionist Sayali Naik and know the importance of her field for professional cricketers. Having worked with multiple athletes, First Class cricketers, international cricketers including Suryakumar Yadav and IPL franchise Delhi Capitals, who better than Sayali to shed light on the crucial aspect for a sportsperson.

Tendulkar व Warne ने रोवली Border-Gavaskar Trophy ची मुहुर्तमेढ
भारत वि ऑस्ट्रेलिया. २१ व्या शतकातील कसोटी क्रिकेट जगतातील कदाचित सर्वात अटीतटीचा सामना. जरी ह्या दोन्ही देशांमधल्या मालिकेचं नामकरण १९९६ मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असं केलं गेलं तरी १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला ग्लॅमर आलं, आणि दोन देश एकमेकांच्या जवळ आले. गौरव जोशी, जो २५ वर्षांहून जास्त काळ ऑस्ट्रेलियात राहतो, तो आपल्याला घेऊन जात आहे भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात, जेव्हा दोन सुपरस्टार्समुळे - आणि एक मैदानाबाहेरील शिलेदारामुळे - हा सामना प्रस्थापित झाला. India vs Australia. Perhaps the fiercest rivalry in the world of Test cricket in the 21st century. Although the series between the two countries was renamed the Border-Gavaskar Trophy in 1996, the India-Australia series became glamourous since the early 1990s, paving the way for the two nations to be drawn closer. Gaurav Joshi, who has lived in Australia for over 25 years, takes us through the early days of the India-Australia cricket journey, when two superstars - and an off-field stalwart - established the rivalry.

Aditya Tare: Mumbai to Ranji Trophy knockouts via Uttarakhand
मुंबईचे रणजी ट्रॉफीमधील आव्हान संपुष्टात आले असले तरी मुंबईच्या शेवटच्या रणजी-विजेत्या कर्णधाराचे - आदित्य तरेचे - आव्हान मात्र अजूनही शाबूत आहे. ह्या हंगामात उत्तराखंडसाठी खेळताना आदित्यने त्यांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या भरारीत मोलाची कामगिरी बजावली आहे. बलाढ्य कर्नाटकाशी लढायला सज्ज होताना आदित्यने त्याच्या व संघाच्या प्रवासाबद्दल CCBK शी गप्पा मारल्या Mumbai's Ranji Trophy challenge may have ended, but the challenge of Mumbai's last Ranji-winning captain - Aditya Tare - is still intact. Playing for Uttarakhand this season, Aditya has been instrumental in their run to the quarterfinals. Aditya chats with CCBK about his and the team's journey as they prepare to take on the mighty Karnataka

Ajinkya Rahane on मुंबई क्रिकेट and domestic cricket
मुंबईचा अजून एक रणजी ट्रॉफी हंगाम अजिंक्यपदाविना संपला. अजिंक्य रहाणे संपूर्ण हंगाम कर्णधारपदी असूनही. ह्याचा अर्थ मुंबईचे क्रिकेटर्स रणजी ट्रॉफी खेळण्यात कमी पडतात? का पुढच्या पिढीला मुंबईसाठी झुंजण्याची इच्छाशक्ती नाहीये? आणि एकंदर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये काय बदल करायला हवे? हे सर्व प्रश्न आम्ही विचारले खुद्द अजिंक्य रहाणेलाचMumbai's Ranji Trophy title-drought has extended by yet anyoehr season. That too, despite Ajinkya Rahane captaining the side for the entire season. Does this mean that Mumbai cricketers lack the skills of playing First Class cricket? Or has the Gen Next lost taking pride in wearing Lion's Crest? And what are the changes required in overall domestic cricket circuit? We asked all these questions to Ajinkya Rahane

CCBK Special, WPL - महिलांची IPL - संघांसाठी पैशांची उधळण
कोण आहेत महिलांच्या IPL - ज्याचं नाव विमेन्स प्रीमियर लीग असणार आहे - मधील संघमालक? सर्व संघमालक IPL मधीलच आहेत? नक्की काय विचार आहे WPL मध्ये गुंतवणूक करण्यामागे? कधी होणार आहे पहिली WPL, आणि त्याची ऑक्शन? संघमालकांनी पैशांची उधळण केल्यानंतर काहीच तासांत पडद्यामागच्या घडामोडी सांगत आहेत आदित्य जोशी व अमोल कऱ्हाडकर 'CCBK स्पेशल' मध्ये Who are the team owners in the Women's IPL - titled as the 'Women's Premier League'? Are all team owners from the IPL owners' club? Why is market so upbeat on investing in WPL? When will the first WPL, and its auction, happen? Hours after the BCCI received a windfall through sale of franchises, Aditya Joshi and Amol Karhadkar reveal the behind-the-scenes events in 'CCBK Special'

Saaptahik CCBK, Arch-rivals मुंबई and महाराष्ट्र in must-win Ranji Trophy game
मुंबईसाठी पृथ्वी शॉची उणीव भासणार आहे. तीच गत महाराष्ट्राची राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड यांच्याबाबतीत. तरीही रणजी ट्रॉफी स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई विरुद्ध महाराष्ट्र सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे, कारण तो जवळजवळ 'नॉकआउट गेम'च आहे. जो संघ जिंकेल तो उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल. तसेच, विदर्भाला - राज्यातील तिसरा संघ - बाद फेरीत स्थान मिळवण्याची काही संधी आहे का? आदित्य जोशी आणि अमोल कर्हाडकर मारत आहेत गप्पा "साप्तहिक CCBK" मध्ये Prithvi Shaw will be missing for Mumbai. Ditto with Rahul Tripathi and Ruturaj Gaikwad for Maharashtra. Still, there will be no love lost between Mumbai and Maharashtra in the last league game of the Ranji Trophy. The game is, after all, a virtual knockout clash. The team that wins will go trough to the quarterfinals. Also, does Vidarbha - the third team from the state - have any chance of making it to the knockouts? Aditya Joshi and Amol Karhadkar preview it in "Saaptahik CCBK"

CCBK Special, कधी लागणार Sarfaraz Khan ची Team India मध्ये वर्णी?
त्याचं वजन बघा. त्याचा फिटनेस बघा. त्याचा यो-यो टेस्टचा स्कोर बघा. हि सगळी कारणं एकीकडे दिली जात असताना सर्फराझ खान मात्र त्याच्या धावांनी आणि त्याच्या मैदानावरील कामगिरीने भारतीय कसोटी संघाचा दरवाजा नुसता ठोठावत नाही, तर तोडायचा प्रयत्न करत आहे. नक्की काय कारण आहे ज्याने निवड समिती अजूनही त्याला घेत नाहीये संघात, पाहूया अमोल कऱ्हाडकरांकडून 'CCBK स्पेशल' मध्ये Look at his weight. Look at his fitness. Look at his Yo-Yo test score. Putting all these reasons - or excuses aside - Sarfaraz Khan continues to knock on the door, in fact has been on the verge of breaking it open, of the Indian Test team with his runs and performance on the field. What exactly is the reason why the selection committee is still not picking him in the squad? Let's hear it from Amol Karhadkar in 'CCBK Special'

Saaptahik CCBK, Will Virat Kohli surpass Sachin Tendulkar's record of 100 hundreds?
विराट कोहली वर्ल्ड कप २०२३ च्या आधी ५० ODI शतकांचा पल्ला पार करेल? त्याहूनही महत्त्वाचं, खरंच कोहली सचिन तेंडुलकरांचा १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडू शकेल? कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजची श्रीलंकेविरुद्धची कामगिरी भारतासाठी किती महत्त्वाची आहे? आणि केएल राहुल व अक्षर पटेलची जागा नयूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कोण घेऊ शकेल? पाहूया 'साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर ह्यांच्या गप्पा Will Virat Kohli cross the 50 ODI hundreds' mark before the 2023 World Cup? Moreover, does he have it in him to go past Sachin Tendulkar's record of 100 hundreds in international cricket? Besides Kohli, how significant was Kuldeep Yadav and Mohammed Siraj's performance with the ball against Sri Lanka? Who will come in for KL Rahul and Axar Patel for the series against New Zealand? Let's hear it from Sunandan Lele and Amol Karhadkar in 'Saaptahik CCBK'

CCBK Special, Why Prithvi Shaw isn't considered for Team India
रणजी ट्रॉफीमधील विक्रमी ३७९ धावांच्या खेळीने पृथ्वी शॉ पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. ह्या खेळीने उघडेल पुन्हा भारतीय संघाचा दरवाजा शॉसाठी? नक्की कारणं काय आहेत ज्यामुळे पृथ्वीला गेली ४ वर्षे कसोटी संघातून डावललं जात आहे? खरंच मैदानाबाहेरील कारणांमुळे शॉची मैदानावरील कामगिरी झाकोळली जात आहे? पाहूया आदित्य जोशी सादर करत असलेल्या 'CCBK स्पेशल' मध्ये Prithvi Shaw has hit the headlines for the right reasons after his record-breaking innings of 379 in the Ranji Trophy. Will it help him break the door into the Indian team again? Why has he been ignored for most of the last four years despite emerging as a Boy Wonder? Aditya Joshi tells us in 'CCBK Special"

Saaptahik CCBK, Bumrah's failed comeback bid; Will Suryakumar Yadav get a chance in ODIs?
जसप्रीत बुमराहचं पुनरागमन व्हायच्या आधीच फिस्कटलं. कसा हाताळायला हवा बुमराहचा मुद्दा? आणि अक्षर पटेलने T२० व ODI क्रिकेटमध्ये तो रविंद्र जाडेजापेक्षा सरस असल्याचं दाखवून दिलं आहे. सुर्यकुमार यादवची श्रीलंकेविरुद्ध ODI मालिकेसाठी संघात जागा होऊ शकेल? आणि ईशान किशनचं काय होणार? ह्या सर्व मुद्द्यांवर 'साप्ताहिक CCBK' मध्ये चर्चा करत सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर त्यांचं ODI मालिकेचं भाकित करत आहेत. तुमचं प्रेडिक्शन आम्हाला नक्की सां

फ्री हिट - CCBK मुक्तपीठ, Ten India pace bowlers you should watch out for
जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि उम्रान मलिक तर आहेतच, परंतु भारताच्या जलदगती गोलंदाजीचा ताफा येणाऱ्या काळात चालू ठेवणारे १० गोलंदाज निवडले आहेत संदीप जगे ह्यांनी. संदीप, जे अलिबाग परिसरातील सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक आहेत, त्यांनी त्यांच्या आवडीचे दहा गोलंदाज निवडले आहेत जे येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवू शकतील. तुमचे टॉप-१० सुद्धा आम्हाला कळवा. हा आहे आपल्या "फ्री हिट - CCBK मुक्तपीठ" सदरातील पहिला दृकश्राव्य भाग. आजवर फ्री हिट अंतर्गत CCBK परिवारातील सदस्यांनी लिहिलेले लेख आपण प्रसिद्ध केले आहेत. तुम्हीदेखील ५ ते १५ मिनिटांचा तुमच्या पसंतीच्या विषयावरील व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला ई-मेल द्वारे पाठवू शकाल. निवडक भाग आम्ही नक्की प्रसारित करू. रेकॉर्डिंग साधनांबाबतीत शंका असल्यास आधीच ई-मेल करा

Saaptahik CCBK, IND v SL: Focus on Hardik Pandya, Washington Sundar in T20I series
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेकडून आशिया कपमधील पराभवाचा वचपा काढेल? कुठल्या खेळाडूंच्या कामगिरीवर असेल नजर T२० मालिकेत? पाहूया आदित्य जोशी व अमोल कऱ्हाडकर ह्यांचे विश्लेषण "साप्ताहिक CCBK" मध्ये

CCBK Explainer, Indian cricket's heroes and zeroes of 2022
२०२२ च्या सुरुवातीला भारतीय क्रिकेट संघाकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु प्रत्यक्षात मात्र रसिकांच्या दृष्टीने निराशा झाली. राहुल द्रविडसारखा माजी खेळाडू प्रशिक्षक आणि पाच वेळा आयपीएल जिंकलेला कर्णधार रोहित शर्मा यांची जोडी अजून तरी कमाल करू शकलेली नाही. २०२३ मध्ये तरी आपण मॉडर्न क्रिकेट खेळायला लागू आणि नवीन निवड समिती संघामध्ये आवश्यक ते बदल करण्याची धमक असणारी असेल या आशेवर २०२३ सुरूवात करूया. तोपर्यंत पाहूया २०२२ मधील भारतीय पुरुष व महिला क्रिकेट संघामधील 'हिरो' आणि 'झिरो' 'बी. यु. भंडारी प्रस्तुत CCBK एक्स्प्लेनर' म

Saaptahik CCBK, Time running out for KL Rahul and Rahul Dravid? ft Sunandan Lele
बांगलादेशविरुद्ध रडतखडत जिंकलेल्या मालिकेने २०२२ चा शेवट जरी गोड झाला असला तरी ह्या वर्षात भारतीय क्रिकेटवरील विविध प्रश्नचिन्ह कायम राहिली आहेत. केएल राहुलला कसोटी संघातून वगळायची वेळ आली आहे का? आणि विराट कोहलीचं काय? संघ व्यवस्थापनाला कठोर भूमिका घ्यावी लागेल? ह्या मुख्य पप्रश्नांवर चर्चा करताना 'बी. यु. भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर देत आहेत भारतीय पुरुष व महिला संघांना २०२२ च्या कामगिरीचे गुण

Saaptahik CCBK, Hot picks at the IPL Auction 2023
२३ डिसेंबरला होणाऱ्या लिलावात १० संघ मिळून २०६ कोटींची उधळण करू शकतात. त्यातील सर्वात जास्त बोली लागू शकणारे १० लक्षवेधी खेळाडू - ५ परदेशी व ५ भारतीय देशांतर्गत खेळाडू - तुमच्यासमोर मांडत आहे अमोल कऱ्हाडकर 'बी. यु. भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK' मध्ये

CCBK बोल फुटबॉल - Who will win the FIFA World Cup final?
२०२२ चा वर्ल्ड कप अर्जेन्टिना किंवा फ्रान्स कोणीही जिंकले तरी एका अर्थाने विजय हा कतारचाच होणार आहे. कारण लिओनेल मेस्सी आणि किलियन एम्बापे हे दोघंही कतार स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंट ग्रुप ची मालकी असलेल्या पी.एस.जी ह्या संघाकडून खेळतात आणि साहजिकच ह्या अंतिम सामन्याचं मुख्य आकर्षण असणार आहेत आणि मेस्सीचा हा वर्ल्ड कप मधला अखेरचा सामना आहे हे नक्की..

CCBK Explainer, How does IPL Auction operate?
२०२३ च्या इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामाची खरी सुरुवात डिसेंबर २३ ला होणाऱ्या ऑक्शनने होत आहे. लिलावाआधी नक्की ऑक्शनच्या आधी आणि लिलाव चालू असताना संघमालक व अधिकारी करतात काय, हे माहित आहे तुम्हाला? जाणून घेऊया आदित्य जोशीकडून "बी. यु. भंडारी प्रस्तुत कॅचबक एक्स्प्लेनर" मध्ये

Saaptahik CCBK, Enigmatic Ishan, daredevil Devika and unsung hero Unadkat
ईशान किशनच्या विक्रमी खेळीचं महत्त्व काय? आणि भारताच्या महिलांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाला रोखण्यात एका पुणेकराचा मोलाचा वाटा आहे, माहीत आहे ना? त्याचबरोबर बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत कोणाचं पारडं असेल जड? आणि रणजी ट्रॉफीच्या ८८व्या हंगामाचं काय आहे वैशिष्ट्य? पाहूया 'बी. यु. भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK' मध्ये

CCBK Special, Ruturaj, Rajvardhan and record run: Ankeet Bawane relives Maharashtra's memorable campaign
ऋतुराज गायकवाडची तडाखेबंद फलंदाजी आणि इतर खेळाडूंच्या झुंजार खेळाच्या जोरावर महाराष्ट्राने नुकत्याच संपलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. उपकर्णधार अंकीत बावणे, ज्याने ऋतुराजच्या अनुपस्थितीत चार सामन्यांत कर्णधारपद भूषवले, सांगत आहे महाराष्ट्राच्या यशाचे रहस्य