
Sports कट्टा
507 episodes — Page 6 of 11

CCBK बोल फुटबॉल - How magical Morocco stunned Spain
स्पेनचा आणखी एक पेनल्टी शूटआऊटमधील पराभव स्पेनच्या 'झिरो माईल' मधील एका बारमध्ये पाहिल्यावर अमोल गोखले सांगत आहे त्याचा अनुभव 'बी. यु. भंडारी प्रस्तुत बोल फुटबॉल' मध्ये. त्याचबरोबर अमोल सांगत आहे पोर्तुगाल व मोरोक्कोच्या यशाचं रहस्य आणिकरत आहे भाकीत प्रत्येक उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्याचं

Saaptahik CCBK, Rohit and Dravid's woes, Rahul on toes?
सौराष्ट्रच्या देशांतर्गत क्रिकेटचं रहस्य काय? भारताचा बांगलादेशविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभव जिव्हारी लागणारा होता का अपेक्षित? हा भारतीय संघ नक्की कोणत्या कर्णधाराचा? आणि केएल राहुलचं पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणं खरंच संभ्रमात पाडणारं आहे? पाहूया सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकरच्या गप्पा "बी. यु. भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK" मध्ये

CCBK Explainer, Who will be India's new chief selector?
अजित आगरकर होणार नवा निवड समिती अध्यक्ष का हेमांगी बादानी? विरेंदर सेहवागसारखा महान, फटकळ व ज्याच्या शब्दाला वजन आहे असा खेळाडू का नाही होऊ शकत भारताचा 'चीफ सिलेक्टर'? आणि इंग्लंडसारखी विशेष T२०I साठी निवड समिती सदस्याची नेमणूक भारतीय क्रिकेटमध्ये होऊ शकते? ह्या प्रश्नांची उत्तरे व निवड समितीसंदर्भातील विविध कंगोरे जाणून घेऊया "बी. यु. भंडारी प्रस्तुत CCBK एक्स्प्लेनर" मध्ये

CCBK बोल फुटबॉल - Ronaldo, Messi steal the limelight at FIFA World Cup
क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेसी, एम्बापे, नेमार व रॉबर्ट लेवान्डोवस्की हे विविध कारणांमुळे फुटबॉल वर्ल्ड कपच्या गेल्या आठवड्यात चर्चेत राहिले. ह्याची कारणे समजावून सांगत आहे अमोल गोखले 'बी. यु. भंडारी प्रस्तुत बोल फुटबॉल' च्या ह्या भागात

Saaptahik CCBK, Should Shikhar Dhawan be persisted till 2023 ODI World Cup?
न्यूझीलंड मधील T२० मालिकेतील यशानंतर हार्दिक पंड्या २०२४T२० वर्ल्ड कपसाठी कर्णधारपदाचा प्रमुख दावेदार आहे? संजू सॅम्सन व उमरानमलिकला संधी मिळायला हवी होती T२० मालिकेत? एकदिवसीय मालिकेचा कर्णधारशिखर धवन २०२३ वर्ल्ड कपसाठी योग्य सलामीवीर आहे? आणि विजय हजारेट्रॉफीमध्ये नॉर्थ-ईस्टर्न संघांना मोठ्या संघांबरोबर खेळवणे योग्य आहे?जाणून घेऊया ज्येष्ठ क्रीडासमीक्षक सुनंदन लेलेंबरोबर "बी. यु. भंडारीप्रस्तुत साप्ताहिक CCBK" मध्ये

CCBK बोल फुटबॉल - FIFA World Cup 2022 format explained
अल्कोहोल सेवनावर बंदी आणल्यावर चाहत्यांनी काय करायचं मैदानात? त्याहून महत्त्वाचं, वर्ल्ड कपमधील विजेतेपदाचे प्रमुख दावेदार कोण आहेत? "बी. यु. भंडारी प्रस्तुत बोल फुटबॉल" मध्ये अमोल गोखलेचा एक्स्प्लेनर पहा व तुमचे दावेदार सांगा आम्हाला

CCBK बोल फुटबॉल - Qatar 2022: Background, peculiarities and controversies
कॉफी आणि क्रिकेट तर आहेच, 'बरंच काही' ची सुरुवात फुटबॉल वर्ल्ड कपने करूया "बी. यु. भंडारी प्रस्तुत बोल फुटबॉल" मालिकेत.क्रीडापत्रकार अमोल गोखले, ज्यानी नुकतंच रिअल माद्रिद ग्रॅड्यूएट स्कुल येथून फुटबॉल कोचिंग आणि मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स पूर्ण केलं आहे आणि एका स्थानिक फुटबॉल क्लब मध्ये आता काम करतो आहे, तो पहिल्या भागात सांगत आहे २०२२ वर्ल्ड कप कतारमध्ये खेळवला जाण्याची पार्श्वभूमी, ह्या वर्ल्ड कपची वैशिष्ट्ये आणि स्पर्धेबद्दल उद्भवलेले विविध विवाद

CCBK T२० आतषबाजी - Powerplay, strike rate haunt India in T20 World Cup
वयस्कर संघ. दोन महत्त्वाच्या खेळाडूंची अनुपस्थिती. आणि इंग्लंडचा झंझावात. ह्या सर्वांच्या पलीकडे जाऊन "बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी" मध्ये अमोल कऱ्हाडकर मांडत आहे दोन नाजुक मुद्दे ज्यामुळे भारताचा उपांत्य सामन्यातील पराभव जिव्हारी लागला. पॉवरप्लेमधील कामगिरी आणि त्याच्याशीच निगडित असलेले तेच पहिल्या तीन क्रमांकाचे फलंदाज हा एक अनाकलनीय मुद्दा होत आहे. २०२४ साठी आम्ही ठेवत आहोत काही पर्याय ज्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

CCBK T२० आतषबाजी - What's the secret of Suryakumar Yadav's success? Ask Vinayak Manel "ft. Vinayak Mane"
सूर्यकुमार यादवच्या T२० विश्वचषकातील अचंबित करणाऱ्या कामिगिरीचं रहस्य काय? सूर्याने वर्ल्ड कपसाठी तयारी कशी केली? कोण करायचं त्याला गोलंदाजी? आणि त्याचे विचित्र फटके तो नेट्समध्ये देखील खेळायचा? जाणून घेऊया विनायक मानेंकडून, जे पारसी जिमखाना संघाचे - सूर्याचा मुंबईतील क्लब - प्रशिक्षक आहेत.

CCBK T२० आतषबाजी - Will it be India vs Pakistan final in T20 World Cup? "ft. Sunandan Lele"
४ आठवडे, ४२ साखळी सामने आणि डझनभराहून जास्त अनपेक्षित निकालानंतर T२० विश्वचषकातील ४ सेमीफायनलिस्ट्स आपल्याला माहित आहेत. वरिष्ठ क्रीडासमीक्षक सुनंदन लेलेंबरोबर घेऊया आढावा साखळी सामन्याचा आणि घेऊया अंदाज भारताच्या कामगिरीचा व भारत विरुद्ध पाकिस्तान ह्या अंतिम सामन्याच्या शक्यतेचा

CCBK T२० आतषबाजी - Rahul and Virat star for India against Bangladesh
भारताच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामधील चर्चेतील मुद्दे जाणून घेऊया अमोल कऱ्हाडकरकडून "बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी" मध्ये

CCBK T२० आतषबाजी - India vs Bangladesh: Rohit, Rahul, Karthik in spotlight
केएल राहुलचं करायचं तरी काय? दिनेश कार्तिक होणार का 'फिट'? आणि रोहित शर्मा त्याचं बांगलादेश-प्रेम पुन्हा एकदा मोठी खेळी खेळून सिद्ध करेल? पाहूया भारताच्या बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सुपर १२ सामन्याचं पूर्वावलोकन "बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी" मध्ये

CCBK, T२० आतषबाजी - Can India get past Proteas pacers in Perth?
भारतीय संघाने T२० विश्वचषकात धडाकेबाज सुरुवात तर केली आहे, परंतु ऑक्टोबर ३० ला होणारा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना त्यांच्या बाद फेरीतील प्रवेशासाठी महत्त्वाचा असेल. "बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी" मध्ये अमोल कऱ्हाडकर सांगत आहे ह्या सामन्यात भारतासाठी असलेल्या पूरक व मारक बाबी

CCBK, T२० आतषबाजी - King Kohli floors Pakistan at MCG
एकहाती सामना जिंकवून देणे म्हणजे नक्की काय हे विराट कोहलीने दाखवून दिल्यानंतर मेलबर्न ते माथेरान सर्वत्र जल्लोष होत आहे. MCG वर सामना पाहिल्यानंतर काहीच क्षणांत त्याच्या भावना शब्दबद्ध केलेला आदित्य जोशी, कोहलीच्या कमालीनंतर त्यापासून प्रेरित झालेला होतकरू क्रिकेटर समृद्ध भट व CCBK चा अमोल कऱ्हाडकर सांगत आहेत कोहलीच्या पराक्रमाबद्दल "बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी" च्या ह्या विशेष भागात

S7 Ep 26CCBK Explainer, India vs Pakistan: Will rain play spoilsport on Sunday?
ज्येष्ठ क्रीडामीक्षक सुनंदन लेले मेलबर्नमधून सांगत आहेत T२० वर्ल्ड कपमधील भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना खरंच पावसामुळे न होण्याचा धोका आहे? त्याचबरोबर लेले व अमोल कऱ्हाडकर करत आहेत चर्चा भारत खरंच अजिंक्यपदासाठी दावेदार आहे का, ह्या विषयावर.

S7 Ep 25CCBK Explainer, How India can beat Pakistan at MCG
मेलबर्न क्रिकेट ग्राउंड ला 'The G' असं संबोधतात. तिथे २०२२ T२० वर्ल्ड कपचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळताना रोहित शर्माच्या भारतीय संघाला कोणत्या विशेष बाबींकडे लक्ष द्यावे लागेल? MCG वर खेळायच्या आधी २००८ मध्ये धोनीने व २०१५ मध्ये रोहित व विराटने काय विशेष तयारी केली होती? आणि एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला २३ ऑक्टोबर - व त्यानंतरही इतर सामन्यांमध्ये - MCG वरील सामना पाहताना कोणत्या गोष्टींवर बारीक नजर ठेवावी लागेल? सांगत आहे CCBK चा The G - गौरव जोशी - "बी. यु. भंडारी प्रस्तुत गॅवचा गुरुवार" मध्ये

S7 Ep 24CCBK Explainer, Can India win the T20 World Cup in 2022?
शाकिब अल हसनच्या बांगलादेशकडून जेवढी निराशाजनक कामगिरीची खात्री आहे त्याच्या कित्येक पट आशा-अपेक्षांचं ओझं रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. भारताला १५ वर्षांनंतर T२० विश्वविजेता होण्यासाठी परिस्थिती खरंच अनुकुल आहे? हार्दिक पंड्या व सूर्यकुमार यादव झुकवू शकतील पारडं भारताच्या बाजूने? भारताच्या संघाचं 'बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी' मध्ये विश्लेषण करताना गौरव जोशी व अमोल कऱ्हाडकर देत आहेत त्यांचं प्रेडिक्शन. तुम्हाला भारत कुठवर पोहोचेल असं वाटतं ते नक्की कळवा

S7 Ep 23CCBK Explainer, Will Jos Buttler's England boss the T20 World Cup?
'होस्ट' ऑस्ट्रेलियानंतर जर एक संघ T२० विश्वचषकाचा प्रमुख दावेदार असेल तर तो म्हणजे इंग्लंड. खरंच इंग्लंड २०१० ची पुनरावृत्ती करू शकेल? जॉस बटलरला अजिंक्यपदाच्या शर्यतीत स्वतःच्या संघातील कुठले प्रमुख अडथळे पार करावे लागतील? आणि अफगाणिस्तान अखेर स्वतःची छाप वर्ल्ड कपवर सोडू शकेल? पाहूया 'बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी' च्या ह्या भागात

S7 Ep 22CCBK Explainer, Miller magic to work for South Africa? Is Pakistan a title contender?
सर्वात संतुलित गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका मारू शकेल धडक T२० वर्ल्ड कपच्या बाद फेरीत? आणि पाकिस्तान टाकेल एक पाऊल पुढे गेल्या वर्षीच्या साखळी फेरीतील धडाकेदार कामगिरीनंतर? गौरव जोशी व अमोल कऱ्हाडकर टाकत आहेत नजर ह्या दोन संघांच्या ताकदी व उणीवांवर. तुमचं ह्या दोन्ही संघाचं प्रेडिक्शन नक्की सांगा आम्हाला

S7 Ep 21CCBK Explainer, India's T20 World Cup voyage explained
रोहित शर्माची फौज ऑस्ट्रेलियामध्ये पोचली आहे. भारताने पूर्वतयारीसाठी पर्थची निवड का केली?ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या देशात एक वर्ल्ड कप खेळताना काय आव्हाने आहेत? आणि साखळी स्पर्धेत प्रवास सोडून भारत खेळत असलेल्या प्रत्येक मैदानाचं वैशिष्ट्य काय आहे? ह्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी CCBK च्या ऑस्ट्रेलियन-महाराष्ट्रीयन गौरव जोशीपेक्षा दुसरा कोणता पर्याय असेल? पाहूया "बी. यु. भंडारी प्रस्तुत गॅवचा गुरुवार"

S7 Ep 20CCBK Explainer, Williamson's quest for glory, Finch and Co. chase history
T२० वर्ल्ड कपसाठी काहीच दिवसांचा अवधी बाकी राहिला आहे. सुरु करूया CCBK चा काऊंटडाऊन "बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी" सदरात. पहिल्या भागात गौरव जोशी व अमोल कऱ्हाडकर करत आहेत विश्लेषण न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया ह्या तुल्यबळ संघाचं. तुमचं ह्या दोन्ही संघाचं प्रेडिक्शन सांगा व वर्ल्ड कपच्या सफरीत आमच्याबरोबर नक्की रहा.

S6 Ep 48Meet Sarfaraz Khan, the maverick Mumbai run-machine
त्याने आपल्या फलंदाजीने भारतीय क्रिकेटजगतात स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. त्याच्या सातत्यपूर्ण बॅटिंगने त्याचा भारतीय संघात प्रवेश "होणार का?" पेक्षा "कधी होणार?" ह्याची चर्चा जास्त आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये भले मोठी खेळी खेळण्यात त्याची हातोटी असली, तरी T२० मध्येसुद्धा सर्फराझ खान तेवढाच प्रभावी आहे. पाहूया सर्फराझची पहिली मराठी मुलाखत "बी. यु. भंडारी प्रस्तुत CCBK स्पेशल" सदरात

S5 Ep 75Saaptahik CCBK, Who should replace Bumrah for T20 World Cup?
T२० वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी भारताने कोणाला घ्यावे संघात? दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या T२० मालिकेतील भारतासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता? आणि एकदिवसीय मालिकेतूनही डावलल्यानंतर पृथ्वी शॉवर खरंच अन्याय होत आहे का? "बीयु भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK" मध्ये ह्या तीन मुद्द्यांवर प्रकाश टाकत आहे अमोल कऱ्हाडकर

S6 Ep 47A tale of Rohit Sharma's turnaround
रोहित शर्मासाठी २०२२ चा T२० वर्ल्ड कप व २०२३ चा ODI वर्ल्ड कप विशेष महत्त्वाचा का आहे? २०११ वर्ल्ड कपच्या निराशेनंतर रोहितने कसा केला 'कमबॅक'? रोहितचं कार्सचं प्रेम जगजाहीर आहे, परंतु कोणी शिकवलं त्याला कार चालवायला? आणि कोण आहेत रोहितचे आवडते कलाकार? ह्या सगळ्यांची उत्तरं घेऊन येत आहे अमोल कऱ्हाडकर 'बीयु भंडारी प्रस्तुत कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही' च्या ह्या भागात

S5 Ep 74Saaptahik CCBK, Rahane's discipline, Deepti's run-out and Virat's form
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेएवढेच, किंबहुना त्याहून जास्त चर्चा झालेले क्रिकेटजगतातील २ विषय घेऊन येत आहेत गौरव जोशी व अमोल कऱ्हाडकर 'साप्ताहिक CCBK' मध्ये. दुलीप ट्रॉफी अंतिम सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेने सहकारी यशस्वी जयस्वालला खरंच मैदानाबाहेर 'हाकलून' दिलं? आणि शेवटच्या फलंदाजाला नॉन-स्ट्रायकर एंडला धावचीत करून दीप्ती शर्माचं काही चुकलं का? आणि अर्थात, भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी T२० मालिकेतून वर्ल्ड कपसाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? आमची मतं ऐका आणि तुमची सांगा

S6 Ep 46Meet Satyajit Satbhai, the match referee
सामनाधिकारी - साध्या मराठीत मॅच रेफ्री - नक्की करतो काय क्रिकेट सामन्यात? खेळाडूच का बरं होऊ शकतात मॅच? आणि ह्या भूमिकेतील आव्हानं व संधी काय आहेत? चला करूया सैर सामनाधिकाऱ्यांच्या दुनियेत माजी महाराष्ट्राचा खेळाडू व BCCI पॅनेलवरील तरूण मॅच रेफ्री सत्यजित सातभाईकडून. ह्या भागाचे लोकेशन पार्टनर आहेत पुण्यातील "LCR जिमखाना" हे रेस्टॉरंट

S5 Ep 75Where should Smith and Rahul bat during India versus Australia series?
भारत व ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांवर असलेल्या दुखापतींच्या सावटामुळे आगामी मालिका ही T२० वर्ल्ड कपची रंगीत तालीम कदाचित ठरणार नाही. तरीही ह्या मालिकेचं महत्त्व आणि उत्सुकता खचितच कमी होत नाही. 'साप्ताहिक CCBK' मध्ये गौरव जोशी व अमोल कऱ्हाडकर सांगत आहेत ह्या मालिकेचं दोन्ही संघासाठी असलेलं महत्त्व. भागाचा शेवट गौरव व अमोल त्यांचं मालिकेच्या निकालाचे प्रेडिक्शन देऊन करत आहेत. तुमचं प्रेडिक्शन आम्हाला नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.

S1 Ep 3Rahul's batting position and Dravid's impact as coach and much more
केएल राहुलचा T२० वर्ल्ड कपमधील फलंदाजीचा क्रमांक व राहुल द्रविडचे प्रशिक्षकपदाचे वेगळेपण ह्या दोन्ही विषयांबरोबरच तुमच्या विविध शंकांचं निरसन करायचा प्रयत्न करत आहोत प्रश्नोत्तरांच्या तासात. CCBK परिवाराचा सदस्य आदित्य जोशी करत आहे तुमचे प्रतिनिधित्व अमोलला प्रश्न विचारताना

S5 Ep 74Saaptahik CCBK, Safe or risky? How India's squad for T20 World Cup appears
भारताचा T२० विश्वचषकाशी साठी घोषित झालेला संघ समतोल वाटत आहे? संजू सॅम्सन जास्त नाराज असेल का रवी बिश्नोई? आणि कोण ठरू शकेल भारताचा एक्स-फॅक्टर? अमोल कऱ्हाडकरचं मत 'साप्ताहिक CCBK' मधील विश्लेषण पाहून तुमचं मतही कळवा

S6 Ep 45Meet Kiran Navgire: Long jump medallist, Dhoni fan and an international women's cricketer
सोलापूर जिल्ह्यातील अकलूजजवळ श्रीपूरपासून थोडं लांब असलेल्या मिरे गावात वाढलेल्या किरण नवगिरेने थेट भारतीय महिला संघात मजल मारली आहे. इंग्लंड दौऱ्यातील T२० मालिकेसाठी तिची निवड झाली आहे. त्याआधी तिने राष्ट्रीय स्तरावर लांब उडीत पदकंसुद्धा मिळवली आहेत. किरण उलगडत आहे तिचा मिरे ते विमेन इन ब्लु - व्हाया बारामती, अहमदनगर, पुणे आणि नागालँड - हा आश्चर्यकारक प्रवास. त्याचबरोबर ती सांगत आहे तिच्या आदर्श क्रिकेटरबद्दल.

S5 Ep 73Saaptahik CCBK, Kohli's knock or Arshdeep's drop: What will India versus Pakistan be remembered for?
पाकिस्तानविरुद्धचा आशिया कपच्या सुपर ४ मधील पहिला सामना भारत भलेही हरला असेल, तरी विराट कोहलीचं आश्वासक अर्धशतक किती आशादायक आहे? अर्शदीप सिंगने सोडलेल्या गोळ्यातून, अर्रर्र झेलातून, काय प्रतीत होतं? आणि रविंद्र जाडेजा नक्की मुकणार T२० वर्ल्ड कपला? जाणून घेऊया 'साप्ताहिक CCBK' मध्ये अमोल कऱ्हाडकरकडून

S7 Ep 20CCBK Explainer, How Hardik Pandya revived his career
जवळवळ गेली ४ वर्षे हार्दिक पंड्या चुकीच्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. २०२२ मध्ये मात्र त्याने स्वतःची अष्टपैलू खेळाडूची प्रतिमा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे. 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये अमोल कऱ्हाडकर सांगत आहे हार्दिकच्या 'कमबॅक'ची कहाणी

S5 Ep 72Saaptahik CCBK, Hardik, Jadeja and Bhuvneshwar put India on top versus Pakistan
भारताने आशिया कपची सुरूवात पाकिस्तानवरील बहारदार विजयाने केल्यानंतर सुनंदन लेले सांगत आहे सामन्यानंतर दुबईत झालेल्या सेलिब्रेशनबद्दल. त्याचबरोबर लेले व अमोल कऱ्हाडकर घेत आहेत सामन्याचा मागोवा आणि करत आहेत चर्चा भारताच्या फलंदाजीतील क्रमवारीबद्दल. आणि हो, एशिया कप फायनलचं प्रेडिक्शनसुद्धा करत आहेत ते.

S6 Ep 44Difference between being fit and cricket-fit
व्यायामशाळेत - म्हणजे जिम्नॅशियम अथवा जिम मध्ये - जाणं हे तरुणांमध्ये फॅड समजलं जातं, परंतु एका खेळाडूसाठी ते अत्यावश्यक आहे. टीम CCBK जात आहे पुण्यातील स्टेल्थ फिटनेस स्टुडिओमध्ये, जिथे विशेषतः सर्व वयोगटातील क्रिकेटर्सकडे विशेष लक्ष दिले जाते. जाणून घेऊया क्रिकेटर्सच्या फिटनेसबद्दल स्टिल्थमधील ट्रेनर्स व खेळाडूंकडून

S5 Ep 71Saaptahik CCBK, Rahul, Chahar ready for Asia Cup?
केएल राहुल व दीपक चहरच्या झिम्बाब्वे दौऱ्यावरील कामगिरीचा आढावा घेत 'साप्ताहिक CCBK' मध्ये अमोल कऱ्हाडकर व सुनंदन लेले करत आहेत चर्चा आगामी एशिया कपबद्दल. भारत उतरेल जसप्रित बुमराहविना तर पाकिस्तानलाही शाहीन शाह आफ्रिदीच्या दुखापतीचा धक्का बसला आहे. कोणाचं पारडं असेल जड? नक्की पहा व तुमचं मतही सांगा

S6 Ep 43Who is the best cricketer in Celebrity Cricket League? Ask Pushkar Jog
बालकलाकार ते दंतचिकित्सक, बिग बॉस मराठी ते चित्रपट व वेब सिरिज अश्या विविध रूपांतून अभिनेता पुष्कर जोग आपल्याला माहीत आहे. परंतु तुम्हाला माहित आहे पुष्कर हा अस्सल क्रिकेटवेडा आहे. त्याच्या क्रिकेटवेडाचे किस्से - तेंडुलकरला भेटण्यापासून सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये खेळण्यापर्यंत - पाहूया पुष्कर जोगकडून 'क्रिकेटचा किडा' मध्ये

S6 Ep 42What makes Chandrakant Pandit, the KKR head coach, special
कोलकाता नाईट रायडर्सने नुकतीच चंद्रकांत पंडित यांची मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक केली. पंडितांनी त्यांचे पांडित्य देशांतर्गत क्रिकेटमध्ये वारंवार सिद्ध केले आहे. जाणून घेऊया पंडितांच्या शैलीबाबत त्यांच्या हाताखाली खेळलेल्या चार दिग्गज खेळाडूंकडून. हे खेळाडू आहेत पारस म्हाम्ब्रे, आदित्य तरे, रमेश पोवार व अक्षय वखरे.

S7 Ep 19CCBK Explainer, Domestic cricket transfer market explainer
अर्जुन तेंडुलकरने येत्या देशांतर्गत हंगामांत मुंबई सोडून दुसऱ्या संघाकडून खेळायचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया डोमेस्टिक क्रिकेटमधील 'ट्रान्सफर मार्केट' चे नियम 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये अमोल कऱ्हाडकरकडून

S5 Ep 70Saaptahik CCBK, Thrills of CWG, injury scare ahead of T20 World Cup
CWG चे अनुभव, महिला क्रिकेट संघाची कामगिरी, एशिया कपसाठी जाहीर झालेला क्रिकेटचा संघ, T२० वर्ल्ड कपआधी दुखापतींमुळे वाढलेले प्रश्न आणि भारतीय खेळाडूंचे सामन्यानंतर बदललेलं वर्तन. "साप्ताहिक CCBK" मध्ये अमोल कऱ्हाडकर व सुनंदन लेले मारत आहेत गप्पा ह्या सर्व विषयांवर

S6 Ep 41Meet Harsha Bhogle
हैदराबाद असो वा हंबनतोटा, मेलबर्न असो वा मुंबई, लखनौ असो वा लंडन, 'क्रिकेटचा आवाज' अशी ख्याती मिळवलेल्या हर्ष - हो हर्षा नव्हे - भोगलेंना प्रेम, आदर, सन्मान प्राप्त होतो. CCBKच्या दुसऱ्या वाढदिवसाचं औचित्य साधून भोगलेंशी साधूया संवाद त्यांच्या पत्रकार-समालोचकाच्या चार दशकांच्या प्रदीर्घ प्रवासाबद्दल

S7 Ep 19CCBK Explainer, Why IPL owners are investing in South African league
क्रिकेटचा अतिरेक हेच फक्त बेन स्टोक्सच्या ODI निवृत्तीचे कारण आहे? का तोही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दुय्यम स्थान देणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसला आहे? दक्षिण आफ्रिकेतील येऊ घातलेल्या लीगमध्ये का बरं IPL संघमालकांना एवढा 'इंटरेस्ट' आला? हे आहे का सूतोवाच भारतीय खेळाडू परदेशी लीग्जमध्ये खेळताना दिसण्याचे? सांगत आहे अमोल कऱ्हाडकर 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये

Flashback to 1997: Nilesh Kulkarni recalls ecstatic and agonising Test debut
३ ऑगस्ट १९९७ ला डोंबिवलीचा निलेश कुलकर्णी कसोटी क्रिकेटमधील पहिल्या चेंडूवर बळी घेण्याचा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. टेस्ट क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा जरी निलेश अजूनही एकमेव गोलंदाज आहे, तरी त्या सामन्याचे उर्वरित तीन दिवस श्रीलंकेच्या फलंदाजानी उभारलेल्या धावांच्या डोंगरासाठी लक्षात राहतात. परंतु निलेशला बोलिंग योगायोगाने मिळाली त्या दिवशी हे तुम्हाला माहित आहे? आणि का आहे मारवान अटापट्टू, ज्याची विकेट निलेशने घेतली, निलेशवर अजूनही खट्टू? 'त्या' पराक्रमाच्या निमित्ताने जाऊया निलेशबरोबर आठवणींच्या गावा.

S6 Ep 40Meet the curator: CCBK with Praveen Hinganikar - Part 2
खेळपट्टी नक्की कशी तयार करतात? प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात हा प्रश्न कायम येतो. जाणून घेऊया खेळपट्टीशी निगडित सर्व प्रश्नांची उत्तरे सुविख्यात क्युरेटर प्रवीण हिंगणीकर यांच्याकडून. विदर्भाचे कर्णधार, नंतर प्रशिक्षक व BCCI सामनाधिकारी ह्या विविध जबाबदाऱ्या निभावलेल्या हिंगणीकरांनी गेल्या दशकभराहून जास्त काळात स्वतःची क्युरेटर म्हणून ओळख निर्माण केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डचे मुख्य क्युरेटर असलेल्या हिंगणीकरांशी मारूया गप्पा 'पडद्यामागील शिलेदार' सदरात. ऐकूया पूर्वार्ध

S6 Ep 39Meet the curator: CCBK with Praveen Hinganikar - Part 1
खेळपट्टी नक्की कशी तयार करतात? प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात हा प्रश्न कायम येतो. जाणून घेऊया खेळपट्टीशी निगडित सर्व प्रश्नांची उत्तरे सुविख्यात क्युरेटर प्रवीण हिंगणीकर यांच्याकडून. विदर्भाचे कर्णधार, नंतर प्रशिक्षक व BCCI सामनाधिकारी ह्या विविध जबाबदाऱ्या निभावलेल्या हिंगणीकरांनी गेल्या दशकभराहून जास्त काळात स्वतःची क्युरेटर म्हणून ओळख निर्माण केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डचे मुख्य क्युरेटर असलेल्या हिंगणीकरांशी मारूया गप्पा 'पडद्यामागील शिलेदार' सदरात. ऐकूया पूर्वार्ध

S7 Ep 18CCBK Explainer, All you need to know about women's cricket at Commonwealth Games
राष्ट्रकुल खेळ - ऊप्स, कॉमनवेल्थ गेम्स - मध्ये महिला क्रिकेटचा समावेश कसा झाला? कुठले देश बर्मिंगहॅममध्ये तीन पदकांसाठी लढतील? आणि कोण असतील भारताचे प्रतिस्पर्धी? पाहूया 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये

S5 Ep 69Saaptahik CCBK, Will ODI cricket survive the T20 league onslaught?
अक्षर पटेलच्या फलंदाजीचे कौतुक करण्याआधी 'साप्ताहिक CCBK' मध्ये अमोल कऱ्हाडकर व सुनंदन लेले चर्चा करत आहेत एकदिवसीय सामन्यांच्या भवितव्याबद्दल व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील होत असलेल्या उलथापालथीबद्दल. भारतीय क्रिकेटमध्येदेखील बेन स्टोक्स व क्विंटन डि कॉकच्या रांगेत जाऊ शकणारा खेळाडू नजीकच्या भविष्यात दिसू शकतो? आमच्या गप्पा बघाच परंतु तुमचं मतदेखील सांगा

S1 Ep 2Rishabh's revival, Hardik's turnaround, Rohit's technical flaw and Virat's woes
गॅबा कसोटी होती रिषभ पंतच्या कारकीर्दीचा कलाटणी देणारा क्षण? हार्दिक पंड्याने कसा केला मैदानावरील कायापालट साकार? रोहित शर्मा का लटकतो लेफ्ट-आर्म पेसरच्या गोलंदाजीवर? विराट कोहलीचं करायचं काय? आणि प्रेक्षकांना मैदानांवर बेसिक सुविधादेखील का नाही मिळत भारतात? ह्या व अश्या इतर तुमच्या मनातले प्रश्न अमोल कऱ्हाडकरला विचारले आहेत CCBK ची ग्राफिक डिझाईनर रिद्धी वझे व CCBK चा निष्ठावंत श्रोता शुभम वाळुंजने मिळून. ऐकूया'प्रश्नोत्तरांचा तास'

S5 Ep 69Hits and misses in England; Will Dhawan dazzle in West Indies?
रिषभ पंत व हार्दिक पंड्याने शेवट गोड केलाच परंतु मँचेस्टरमधील सुखावह विजयाने दौऱ्याच्या सुरूवातीला लागलेले गालबोट पुसले गेले? "साप्ताहिक CCBK" मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर तीन आठवड्यात तीनही फॉरमॅट्समधील भारताची कामगिरी पडताळत आहेत. त्याचबरोबर आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याकडून त्यांच्या अपेक्षा सांगत आहेत

S5 Ep 68Saaptahik CCBK, Sensational Surya, worrying Virat and an important ODI series
भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात जेवढी सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीची चर्चा झाली तेवढीच आपले लाडके सुनंदन लेलेंचे महेंद्र सिंह धोनी व रवी शास्त्रीबरोबरचे 'फूटेज व्हायरल' झाले. अर्थात "साप्ताहिक CCBK" मध्ये सुरुवातीला सुनंदन सांगत आहे त्या गप्पांमधल्या रंजक आठवणी. त्याचबरोबर सुनंदन या अमोल घेत आहेत T२० मालिकेचा आढावा व ODIs चा प्रिव्यू

S5 Ep 67Saaptahik CCBK, Bazball in Birmingham leads to India's downfall
बॅझ-बॉलचा चमत्कार आणि भारतीय संघाची निस्तेज कामगिरी ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर पाहिलं कि इंग्लंडने सर्वात मोठं लक्ष्य लीलया सर केलं तर भारताने इंग्लंडमध्ये मालिका जिंकायची सोनेरी संधी गमावली. 'साप्ताहिक CCBK' मध्ये अमोल कऱ्हाडकरबरोबर पराभवाची कारणमीमांसा करत आहेत थेट बर्मिंगहॅममधून सुनंदन लेले व गौरव जोशी