PLAY PODCASTS
Sports कट्टा

Sports कट्टा

507 episodes — Page 4 of 11

New Year's Test in South Africa marks the beginning of a blockbuster 2024

The first Weekly Katta of 2024 is all about what lies ahead for the sports lovers in this leap year. Months of June, July and August will see the T20 World Cup, the Euros, the Copa America and the Olympics taking the sports fever to the next level. For Indian Cricket fans, the year is divided in a rather strange way. The T20 bonanza of the Indian Premier League (IPL) and the T20 World Cup is sandwiched between marquee Test series against England and Australia. Amol Gokhale and Amol Karhadkar, Sports Journalist, The Hindu, take a look at what lies ahead for the sports fan with the Test against South Africa imminent. २०२४ हे लीप वर्ष आहेच, पण क्रीडाप्रेमींसाठी कदाचित सर्वात मोठं वर्ष सुद्धा आहे. T२० विश्वचषक, युरो, कोपा अमेरिका आणि ऑलिंपिक अशी मोठ्या स्पर्धांची भाऊगर्दी जून ते ऑगस्ट महिन्यात आहे कॅलेंडरवरच्या नेहमीच्या स्पर्धांव्यतिरिक्त... आणि अर्थातच, ह्या सगळ्यात ३ जानेवारीला सुरु होणारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी विसरून चालणार नाही. नवीन वर्षाच्या पहिल्या वीकली कट्टयावर अमोल गोखले आणि 'द हिंदू' चा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर दोघे आढावा घेत आहेत २०२४मध्ये काय काय वाढून ठेवलंय...

Jan 2, 202413 min

Can Rohit Sharma and Co. end India's Test series drought in South Africa?

वर्ल्ड कप अंतिम सामन्याची निराशा दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील विजयाने भारतीय संघ भरून काढेल? रोहित शर्माच्या फौजेसमोर काय आव्हाने आहेत? बलाढ्य विरोधी संघ, दक्षिण आफ्रिकेतील अवघड परिस्थिती, का शामीची अनुपस्थिती? भारताचा संघ काय असेल 'बॉक्सिंग डे' कसोटीत? आणि भारत खरंच सर करू शकेल 'फायनल फ्रंटियर'? आदित्य जोशी व अमोल कऱ्हाडकर, 'द हिंदू' चे क्रीडापत्रकार, चर्चा करत आहेत भारताच्या विजयाच्या शक्यतेची, हार्दिक पंड्याच्या फिटनेसबद्दल व टॉम करनच्या चुकीबद्दलCan India overcome the disappointment of the World Cup final loss by winning its maiden Test series in South Africa? What will be more challenging for Rohit Sharma & Co: a strong opposition, tricky conditions or the absence of Mohammed Shami? What should be India's ideal combination for the Boxing Day Test? And can India finally surpass the Final Frontier? Aditya Joshi and Amol Karhadkar, a sports journalist with The Hindu, discuss in the "Weekly Katta" the fate of the series along with Hardik Pandya's fitness and Tom Curran's blunder

Dec 25, 202320 min

Konkan to Pro Kabaddi League: Journey of Siblings Shubham and Aditya Shinde

The younger sibling usually follows in the footsteps of the elder one. However, Shubham Shinde was inspired after seeing his younger brother Aditya on the field. Turning out for Bengal Warriors, Shubham is into his fifth season of the Pro Kabaddi League (PKL), while Aditya is playing his debut season with the same franchise. The siblings from Konkan share their Kabaddi journey with Amol Gokhale on Kattyavarchya Gappa… लहान भावंडं सहसा मोठ्या भावंडाचं सहजी अनुकरण करतात. पण शुभम शिंदेने कबड्डी खेळायची प्रेरणा घेतली धाकट्या आदित्यला मैदानात पाहून... पण आजघडीला बंगाल वॉरियर्सकडून खेळणारा शुभम शिंदे प्रो कबड्डी लीगचा (PKL) पाचवा हंगाम खेळतोय तर आदित्यदेखील बंगालकडून PKL चा पदार्पणाचा हंगाम खेळतोय. कोकणच्या मातीतले हे दोघं भाऊ - शुभम आणि आदित्य शिंदे - त्यांचा कबड्डीचा प्रवास सांगत आहेत अमोल गोखलेला कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये...

Dec 23, 202318 min

IPL Auction 2024: KKR and SRH break bank for Starc and Cummins

७२ खेळाडू. २३०.४५ कोटींची उधळण. सर्वात मोठी बोली. आणि देशांतर्गत खेळाडूंची चांदी. IPL च्या १७ व्या लिलावाचा आढावा घेत आहेत अमोल गोखले व दुबईहून 'द हिंदू' साठी ऑक्शन वृत्तांकानासाठी गेलेला अमोल कऱ्हाडकर... 72 players were sold. Rs 230.45 crore were splurged. The highest bid ever in an IPL Auction was witnessed. And the relatively unknown domestic cricketers joined the Crorepati Club. Amol Gokhale and Amol Karhadkar, who covered the auction in Dubai for The Hindu, recap the 17th player auction of the Indian Premier League...

Dec 20, 202315 min

Players to watch out for in IPL Auction 2024

The stage is set for the IPL auction on December 19. Why this 'mini' auction matters? Which 'uncapped' players should one watch out for? How do IPL teams decide which player they want to 'go for'? Who will be a millionaire after the IPL? Which international stars will spark a bidding war? Troika of Sports Katta - Aditya Joshi, Amol Karhadkar, Sports Journalist, The Hindu, and Amol Gokhale explore various facets of the auction in this IPL auction special… २०२४ IPL साठी प्लेयर ऑक्शन ज्याला मराठीत लिलाव म्हणतात तो १९ डिसेंबर आहे. हे 'मिनी' ऑक्शन महत्त्वाचं का आहे? कुठल्या 'uncapped' खेळाडूंवर विविध संघाचं लक्ष आहे? कुठल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी मोठी बोली लागू शकते? IPL ऑक्शनच्या अश्या विविध पैलूंचं विश्लेषण केलंय स्पोर्ट्स कट्टाच्या त्रिकुटाने - आदित्य जोशी, अमोल कऱ्हाडकर, क्रीडा पत्रकार द हिंदू व अमोल गोखलेने स्पोर्ट्स कट्टाच्या ह्या IPL ऑक्शन विशेष भागात...

Dec 17, 202321 min

Things you should know before WPL auction

The first season of the Women’s Premier League (WPL) was a hit. The auction is an integral part of WPL and ahead of the second season, a mini auction will take place in Mumbai on December 9. Ahead of the WPL auction, here are the things you should know, Indian and foreign players to watch out for and how teams are stacked. Amol Gokhale explains on Weekly Katta… वूमेन्स प्रीमियर लीगचा (WPL) पहिला सिझन यशस्वी झाला. दुसऱ्या सिझनच्या आधी अर्थातच खेळाडूंचा लिलाव म्हणजे auction होणार आहे मुंबईत ९ डिसेंबरला. त्या अनुषंगाने वीकली कट्ट्यावर अमोल गोखले उजळणी करतो आहे कि कुठल्या संघाची काय परिस्थिती आहे, कुठल्या भारतीय व परदेशी खेळाडूंवर तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि संघाना आकड्यांचा काय खेळ खेळावा लागणार आहे...

Dec 8, 20237 min

Suryakumar Yadav a worthy captaincy candidate for T20 World Cup?

Team India has already put the World cup final loss behind them. The team management and the selectors are already planning for the 2024 T20 World Cup. The recently-concluded Australia T20 series and the forthcoming T20s in South Africa are a clear indication of it. They are looking at Suryakuamar Yadav as a potential captain for the World Cup, should the need arise. Is it justified? Closer home, in Mumbai, India women will also be preparing for the T20 World Cup against England and Australia. These series mark a new era for the women’s team with Amol Muzumdar at the helm of affairs. Amol Gokhale and Amol Karhadkar take out a magnifying glass to look at these events on Weekly Katta. भारतीय संघाने २०२ वर्ल्ड कप मधला पराभव विसरून २०२४ मधल्या T२० वर्ल्ड कपची सुरु देखील केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची T२० मालिका आणि आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची T२० मालिका हे त्याचंच द्योतक आहे. ह्या मालिकांमध्ये सूर्यकुमार यादव कर्णधारपदी आहे. संघव्यवस्थापन वर्ल्ड कपकडे नजर ठेवून त्याकडे कर्णधारपदाची दावेदार म्हणून बघत आहे. त्याची हि निवड योग्य आहे का?दुसरीकडे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन मोठ्या मालिका घरच्या मैदानावर सुरु होत आहेत. संघाचे नवे प्रशिक्षक अमोल मुझुमदार ह्यांची ती पहिली कसोटी असणार आहे. अमोल गोखले आणि अमोल कऱ्हाडकर भारतीय संघाच्या दोन्ही 'सिनियर टीम्सच्या' आगामी मालिकांवर चर्चा करत आहेत वीकली कट्ट्यावर...

Dec 7, 202319 min

Rahul Patil: Solapur to Wellington, with Love for Cricket

One journalist, That's all. Rahul Patil is a Maharastrian born in Solapur, brought up in Goa and based in Wellington. He was the only Kiwi journalist who covered the 2023 Cricket World Cup in India. But that isn't his full-time job. He is a banker with ANZ, New Zealand's largest bank, and is a qualified umpire at club level in Wellington. That's not all. He is the manager of a national team of Cook Islands, a tiny country of 15,000 population in the Pacific Ocean. Rahul Patil shares his fascinating journey from Solapur to Goa to Wellington to Cook Islands and his love for cricket on Kattyavarchya Gappa with Amol Gokhale... न्यूझीलंडमधून क्रिकेट वर्ल्ड कप कव्हर करायला फक्त एक पत्रकार आला होता. तो पत्रकार म्हणजे मूळचा सोलापूरचा असलेला गोवेकर आणि वेलिंग्टनस्थित राहुल पाटील. राहुल फक्त क्रिकेट कव्हर करत नाही, तो बँकेत नोकरी करतो, स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळतो, आणि अंपायर म्हणून पण काम करतो. इतकंच काय, तो पॅसिफिक महासागरात असलेल्या १५,००० लोकवस्तीच्या 'कूक आयलंड्स ' नावाच्या चिमुकल्या देशाच्या क्रिकेट टीमचा मॅनेजर पण होता. राहुल पाटीलने त्याच्या न्यूझीलंड आणि कूक आयलंड्समधल्या क्रिकेटच्या अनुभवावर कट्ट्यावरच्या गप्पा मारल्या आहेत अमोल गोखले सोबत...

Dec 5, 202316 min

Should Rohit Sharma & Virat Kohli play 2024 T20 World Cup?

The 2023 World Cup is barely over and there’s already talk about the 2024 T20 World Cup happening in the West Indies and the USA. Now the key question for the Ajit Agarkar-led selection committee is should they go back to Rohit Sharma and Virat Kohli or should they persist with the young guns in the shortest format. ‘Should Rohit Sharma & Virat Kohli play 2024 T20 World Cup?’ Amol Gokhale and Aditya Joshi take a look at both sides of the coin while Amol Karhadkar chips in with his take on the matter on Weekly Katta… २०२३ वर्ल्ड कप संपतो न संपतो, चर्चा सुरु झाली आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या २०२४ T२० वर्ल्ड कपची. अजित आगरकर आणि निवड समितीसमोर सगळ्यात मोठी डोकेदुखी असणार आहे ती दोन नावांची. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला T२० संघात आणि पर्यायाने वर्ल्ड कप साथीच्या संघात स्थान द्यावं का युवा खेळाडूंवर दाखवलेला विश्वास कायम ठेवावा. वीकली कट्टावर अमोल गोखले, आदित्य जोशीने आणि अमोल कऱ्हाडकरने मुद्द्याला हात घातला आहे, 'रोहित आणि विराटने T२० वर्ल्ड कप खेळावा का?'

Nov 28, 202317 min

Will 'retained' Hardik Pandya move to Mumbai Indians for IPL 2024?

IPL २०२४ ची retention window २६ नोव्हेंबरला संपली. वर्ल्ड कप मधल्या भारताच्या पराभवानंतर हार्दिक पंड्या झोतात आला तो त्याच्या घरवापसीच्या चर्चेने. पण जेव्हा प्रत्येक संघाने त्यांचे 'retain' केलेले खेळाडू जाहीर केले तेव्हा हार्दिक पंड्याचा समावेश गुजरात टायटन्समधेच होता, मुंबई इंडियन्समध्ये नाही. पण ह्याचा अर्थ IPL २०२४ हार्दिक गुजरातकडून खेळेलच याची शाश्वती नाही. वीकली कट्ट्यावर आदित्य जोशी, अमोल गोखले आणि अमोल कऱ्हाडकर चर्चा करत आहेत IPLच्या retention window वर... The deadline for the IPL retentions closed on Sunday, a week after the World Cup final. All the talk centred around Hardik Pandya’s likely move from Gujarat Titans to Mumbai Indians. However, come deadline day, Hardik was ‘retained’ by the 2022 IPL Champions. But with the ‘trading’ window open till December 12, the move can still go through. Aditya Joshi, Amol Gokhale, and Amol Karhadkar analyse all the moves heading into the auction for IPL 2024 in Weekly Katta...

Nov 27, 202316 min

Cricket and Tourism in Sri Lanka ft Sunandan Lele

India and Sri Lanka will face each other in the final of the Asia Cup on September 17. The tournament made the headlines for all the reasons. But the cricketers - past and present, fans and journalists, all enjoy the Sri Lanka tour for all the memorable reasons. In this episode of 'कट्ट्यावरच्या गप्पा', Amol Karhadkar takes a trip down memory lane with Sunandan Lele from the sea shores of Colombo… १७ सप्टेंबरला कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडिअमवर भारत आणि श्रीलंका आशिया कपचा अंतिम सामना आहे. स्पर्धा मैदानावरच्या आणि मैदानाबाहेरच्या अनेक कारणांनी चर्चेत राहिली. पण आजी-माजी क्रिकेटपटू, प्रेक्षक आणि पत्रकार सर्वांसाठी श्रीलंका दौरा ही एक पर्वणी असते, आठवणींचा खजिना गोळा करायची. अशाच आठवणींचा खजिना उलगडून दाखवत आहेत अमोल कऱ्हाडकर आणि सुनंदन लेले 'कट्ट्यावरच्या गप्पा' च्या ह्या भागात, थेट श्रीलंकेतल्या समुद्रकिनाऱ्यावरून..

Sep 17, 202323 min

Team India’s perfect game against Pakistan

India played a perfect match against Pakistan in the Asia Cup Super 4s. Rohit Sharma, Shubhman Gill, Virat Kohli and KL Rahul smashed Shaheen Shan and boys around the park. Kuldeep Yadav topped it up with a splendid fifer and made Pakistan batters dance to his tunes. Finally, the focus has switched to cricket in the Asia Cup rather than all the outside noise. Amol Gokhale and Amol Karhadkar talk about the India-Pakistan game, Shreyas Iyer’s latest injury and all the bruhaha around the Asia Cup. पाकिस्तान विरुद्ध सर्व गोष्टी भारताच्या मनासारख्या घडल्या आणि भारताने कट्टर प्रतिस्पर्ध्यावर दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि के. एल. राहुल सगळ्यांनी तुफान फलंदाजी केली. गोलंदाजीत कुलदीप यादवने पाकिस्तानला आपल्या तालावर नाचवलं. आत्ता कुठे आशिया कप सुरु होतोय असं वाटायला लागलंय इतक्या बाकीच्या गोष्टी आत्तापर्यंत घडल्या आहेत. श्रेयस अय्यर पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. ह्याच गोष्टींवर चर्चा करायला अमोल गोखले आणि अमोल कर्हाडकरने हा Weekly कट्टा जमवला आहे...

Sep 13, 202315 min

Who will bat at 5 in India vs Pakistan in Asia Cup ?

Where are you watching India vs Pakistan in the Asia Cup? In what could turn out to be three back-to-back India-Pakistan games in Sri Lanka, it all leads the way to a mega clash on October 15 at Narendra Modi Stadium in Ahmedabad. But India still has to find their No. 5 batter in place of injured KL Rahul. Will coach Rahul Dravid continue to experiment with the batting line-up? Rohit Sharma facing Shaheen Shah Afridi is a duel to watch for. Sri Lanka-bound Amol Karhadkar and Aditya Joshi preview the big game in this episode of Weekly Katta.

Sep 4, 202315 min

Hardik Pandya भविष्यात Team Indiaचा कर्णधार असावा का ?

Team India’s 2-3 defeat against the West Indies has raised questions about Hardik Pandya’s captaincy. But is it too soon to judge him as a leader? What about the ‘performance’ of Rahul Dravid as a coach? Is time running out for Sanju Samson to showcase his potential? Jasprit Bumrah returns to international cricket with T20s against Ireland with some new faces in the team, including the head coach for the tour - Sitanshu Kotak. Amol Karhadkar and Amol Gokhale ponder over the implications of the Caribbean Tour in this episode of Saaptahik CCBK... वेस्ट इंडिज विरुद्ध T२० मालिका ३-२ अशी हरल्यामुळे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वगुणांवर साहजिकच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पण त्याच्या नेतृत्वावर खूप लवकर अविश्वास दाखवला जातोय का? राहुल द्रविडच्या प्रशिक्षक म्हणून कामगिरीचं काय? संजू सॅम्सनने मिळालेली संधी पुन्हा हातातून घालवली आहे... आर्लंडविरुद्ध T२० मालिकेद्वारे जसप्रीत बुमराह पुनरागमन करतो आहे, त्याच्या जोडीला नवे खेळाडूच नव्हे तर सितांशू कोटकच्या रूपाने नवीन प्रशिक्षक देखील आहे. ह्या आणि अश्या घडामोडींचा आढावा घेत आहेत अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले साप्ताहिक CCBKच्या ह्या भागात...

Aug 15, 202312 min

Tilak Varma ला World Cup साठी fast-track करावं ?

टीम इंडिया, विश्वचषक आणि नंबर चारचा घोळ, हे काही नवीन नाही. २०१९ ला झालेली गडबड कोणालाच विसरता येणार नाही. तीच चूक पुन्हा होत आहे? श्रेयस अय्यर फिट नसेल तर भारताकडे सक्षम पर्याय आहे? केएल राहुल दुखापतीमधून सावरला नसेल तर पाच नंबरला फलंदाजी आणि विकेटकिपींग अशी दुहेरी जबाबदारी संजू सॅम्सनला देण्यासाठी पुरेशी तयारी केली आहे? वेस्ट इंडिजविरूद्ध २०-२० मध्ये चमकलेल्या तिलक वर्माला फास्ट-ट्रॅक करावं? का आत्तापर्यंत एकदिवसीय मॅचचं कोड न उलगडलेल्या सूर्या यादववर विश्वास टाकावा? या सर्व मुद्द्यांवर 'चौफेर' प्रकाश टाकत आहे आदित्य जोशी 'CCBK स्पेशल' मध्ये.Team India, World Cup and a controversy surrounding the No. 4 batter. Is the same script of 2019 being followed come the 2023 ICC Men's World Cup? Are the mistakes of 2019 cropping their head all over again in the build-up to the World Cup? Who is the No. 1 back-up should Shreyas Iyer not recover from his rehab following a back surgery? If KL Rahul is not passed fit in time after a thigh surgery, can Sanju Samson be a like-for-like replacement at No. 5, playing the dual role of a wicketkeeper-batter? Should the selectors take a punt and fast-track Tilak Varma after his impressive T20I debut in the West Indies? Aditya Joshi sheds light on these aspects in "CCBK Special".

Aug 12, 202310 min

Does anyone care for cricket fans ahead of the World Cup ?

The schedule is yet to be finalised. It results in sale of tickets being discussed only in WhatsApp and Telegram groups. With less than two months remaining for the 2023 Men's Cricket World Cup, it looks certain that the International Cricket Council and Board of Control for Cricket in India is on the verge of converting the World Cup into a royal mess. Amidst uncertainly surrounding various aspects in the lead-up to the World Cup, only one thing appears to be certain: we don't care for the fans. Over to 'Saaptahik CCBK'. वेळापत्रक नक्की नाही. त्यामुळे तिकीटविक्रीचा पत्ता नाही. म्हणजे मैदानावर विश्वचषकाचे सामने बघायचा 'प्लॅन' करणं फक्त मनातल्या मनात शक्य आहे. २०२३ च्या क्रिकेट विश्वचषकाशी निगडित विविध बाबींबद्दल अनिश्चितता आहे. ज्या पद्धतीने वर्ल्ड कपचे नियोजन चालू आहे, त्यावरून एकाच गोष्ट निश्चित वाटत आहे, ती म्हणजे क्रिकेट चाहत्यांबद्दल अनास्था. पाहूया 'साप्ताहिक CCBK'.

Aug 9, 202310 min

भेटूया Utkarsha Pawar क्रिकेटरला, ना Mrs Ruturaj गायकवाडला

Every time a girl marries a famous personality, the first question she faces is: “What about your career? Will you continue to work as you previously were?” Maharashtra all-rounder Utkarsha Pawar is no exception. Just that she is clear about it . “I will continue to play cricket. I have full support of mine and my husband's family.” If you haven't guessed it yet, Utkarsha happens to be the wife of India cricketer Ruturaj Gaikwad. In a candid chat with Amol Gokhale on 'CCBK Special', Utkarsha opens up about her cricketing journey, and... well, you guessed it right... एका प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाशी लग्न झाल्यावर आजही मुलीचं करिअर आणि स्वत:ची ओळख पुसली जाते, असा समज आहे. पण ही मुलगी वेगळी आहे. नवऱ्याबद्दल प्रश्न विचारणार असाल तर मुलाखत घेऊ नका असं आधीच स्पष्ट सांगून आपण वेगळे आहोत याची जाणीव तिने करून दिली. "माझ्या आणि ऋतुराजच्या घरच्यांपेक्षा बाकीच्यांनाच माझ्या करिअरची काळजी आहे, पण मला क्रिकेटच खेळायचयं आणि त्यासाठी मी शक्य तेवढी मेहनत करते आहे," असं सांगत आहे महाराष्ट्राची अष्टपैलू क्रिकेटर उत्कर्षा पवार. तिला ऋतुराजची बायको अशी ओळख नकोय, आणि उत्कर्षा म्हणून नावारूपाला यायचं आहे. एक वेगळा विचार, वेगळी ओळख आणि एक वेगळी मुलाखत अमोल गोखलेबरोबर 'CCBK स्पेशल' मध्ये...

Aug 5, 202322 min

Rohit-Kohliला आराम, World Cup च्या स्वप्नांना रामराम…

The three-ODI series against the West Indies was billed as a part of process for the Team India’s World Cup preparations. But Rohit Sharma and Virat Kohli were given a rest. Did the ‘Team Management’ experiment too much in the series? Did it answer the question of who bats in the middle order? Jasprit Bumrah makes a comeback to international cricket as a skipper for Ireland T20s. Is this his ultimate fitness test for the Asia Cup and the 2023 ICC World Cup? Amol Karhadkar and Amol Gokhale talk about it in this episode of Saaptahik CCBK… भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेकडे भारताच्या वर्ल्ड कप तयारीचा अखेरचा टप्पा म्हणून पाहिलं जात होतं. पण रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मालिकेत विश्रांती दिली गेली. संघ व्यवस्थापनाने 'प्रयोगांची' मालिका जरा जास्तच लांबवली का? आयर्लंड विरुद्द द्वारा जसप्रीत बुमराह अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन करणार आहे. ही मालिकाच त्याची खरी 'फिटनेस टेस्ट' असेल. अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले चर्चा करत आहेत साप्ताहिक CCBK मध्ये...

Aug 2, 202316 min

Yash Thakur: MS Dhoni सारखा यष्टीरक्षक ते विदर्भाचा 'लखनवी नवाब'

नागपूर मध्ये घराजवळ क्रिकेट अकादमी सुरु होताना बघून यश ठाकूरने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याला महेंद्र सिंह धोनी सारखं यष्टीरक्षक व्हायचं होतं पण तो झाला वेगवान गोलंदाज. आज उमेश यादवच्या जोडीला तो विदर्भाचा हुकमी एक्का आहे. भारताकडून तो १९-वर्षाखालील वयोगटात खेळला आहे आणि २०२३ मध्ये त्याने लखनौ सुपर जायंट्स कडून IPL मध्ये पदार्पणाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवला गोलंदाजी करायची तरी कशी? भारतासाठी क्रिकेट खेळण्यासाठी किंवा IPL च्या स्तरावर पोहोचण्यासाठी कुठल्या प्रकारची जिद्द लागते आणि किती कष्ट घ्यावे लागतात? अमोल कऱ्हाडकर बरोबर गप्पा मारतो आहे लखनौचा नवाब यश ठाकूर, CCBKच्या विशेष भागात... Yash Thakur began playing cricket seeing a new cricket academy open up near his house in Nagpur. He wanted to be a wicketkeeper like MS Dhoni, but he ended up becoming a pacer. Today, he is bowling spearhead for Vidarbha with India international Umesh Yadav. He has represented India at U-19 level and was impressive in his debut season for Lucknow Super Giants in the IPL. How does one bowl to Suryakumar Yadav? What does it take to play for Team India or reach IPL? Lucknow’s emerging star Yash Thakur in candid conversation with Amol Karhadkar in this CCBK Special…

Jul 29, 202345 min

Sanju Samson or Ishan Kishan? World Cup तयारीचा पहिला प्रश्न

The rain gods played spoilsport on the fifth day of the Ashes and the final day of India vs West Indies but India bagged the series 1-0. There were plenty of positives for Rahul Dravid-coached side, like Yashasvi Jaiwal’s successful debut, Rohit Sharma and Virat Kohli’s return to form and Mohammed Siraj leading the attack. However, now the focus will shift to the ODI series with the World Cup on the horizon. The team would love to see Sharma-Kohli’s form to continue in a shorter format. But who should don the gloves? Sanju Samson or Ishan Kishan? Will Suryakumar Yadav get another chance in the ODIs? Amol Karhadkar and Amol Gokhale analyse in this episode of Saaptahik CCBK… पावसाच्या व्यत्ययाने भारत आणि वेस्ट इंडिज ह्यांचा मधला दुसरा सामना अनिर्णित राहिला. पण ह्या मालिकेत भारताच्या दृष्टीने जमेच्या अनेक बाजू होत्या: यशस्वीचं दिमाखदार पदार्पण, रोहित आणि विराटचं फॉर्म मध्ये येणं आणि मोहम्मद सिराजने सांभाळलेली गोलंदाजीची धुरा... पण आता संघ व्यवस्थापनाचं संपूर्ण लक्ष विश्वचषकाच्या दृष्टीने एकदिवसीय मालिकेवर असेल. के. एल. राहुलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन का ईशान किशन कोण करेल यष्टिरक्षण? सूर्यकुमार यादवला अजून किती संधी मिळेल? ह्यावर चर्चा करत आहेत अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले साप्ताहिक CCBK मध्ये..

Jul 26, 202312 min

Yashasvi Team India चा नवा तारा, Ruturaj Gaikwad कडून आशा सुवर्ण पदकाची

Yashasvi Jaiswal stole the headlines with a scintillating hundred on debut against the sorry West Indies side. Ravichandran Ashwin keeps proving his worth again and again with match-winning knocks, but no point in dwelling on the WTC final. Rohit Sharma and his men will look to pocket an easy 2-0 series win. On a white ball front, Ruturaj Gaikwad has been elevated to a leadership role for the Asian Games in China, signalling his rising stock in the team. Indian squad looks well-balanced to bring home gold. Amol Karhadkar and Amol Gokhale take stock of recent developments in Indian cricket in this episode of Saaptahik CCBK… दुबळ्या वेस्ट इंडिज विरुद्ध यशस्वी जयस्वालने पदार्पणात दमदार शतक करून सगळ्यांची मनं जिंकून घेतली. रविचंद्रन अश्विनने त्याची उपयुक्तता परत सिद्ध करून दाखवली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अश्विन खेळला असता तर, ह्या चर्चेला पुन्हा तोंड फोडले. रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाचं आता लक्ष असेल की मालिका २-० खिशात कशी घालता येईल. मर्यादित सामन्यांचा विचार करता, भारतीय संघाची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी घोषणा करण्यात अली आणि ऋतुराज गायकवाडकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. निवडसमितीने ऋतुराजच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी जो संघ निवडला आहे तो अत्यंत समतोल संघ असून प्रत्येकाला अपेक्षा सुवर्ण पदकाचीच असेल. अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले भारतीय क्रिकेट मधल्या ताज्या घडामोडींचा आढावा घेत आहेत साप्ताहिक CCBKच्या ह्या भागात...

Jul 18, 202311 min

West Indies मध्ये Team India ची 'कसोटी' लागेल का ?

Team India will begin their 2023-25 World Test Championships (WTC) cycle with a two-Test tour of the Caribbean. There will be a new face at No. 3 for the Indian cricket team. The only unknown is whether it will be Yashasvi Jaiswal or Ruturaj Gaikwad or Shubman Gill. Who will spearhead the bowling attack with Mohammed Siraj? Will Mukesh Kumar get an opportunity? But what about the ‘Big Guns’ of India? How crucial is this series for the likes of Rohit Sharma, Virat Kohli and Ajinkya Rahane? And what about the opposition, what sort of a fight will they put up? Amol Karhadkar, Aditya Joshi and Amol Gokhale do a preview of the West Indies tour in this episode of Saaptahik CCBK… भारताची २०२३-२५ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकल वेस्ट इंडिज मधल्या दोन कसोटींच्या मालिकेने सुरु होणार आहे. ह्या मालिकेपासून भारतीय संघात काही प्रमाणात का होईना बदल दिसायला सुरुवात होईल. तिसऱ्या क्रमांकावर नवीन चेहरा असेल, तो यशस्वी जैस्वाल असेल, ऋतुराज गायकवाड असेल का शुबमन गिल असेल? मोहम्मद सिराजच्या जोडीला कोण असतील वेगवान गोलंदाज? मुकेश कुमारला मिळेल संधी? आणि रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य राहणे ह्या मातब्बर खेळाडूंसाठीदेखील त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने हे मालिका महत्वाची आहे. पण ह्या सगळ्यामध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारतासमोर किती आव्हान निर्माण करतो हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरेल. साप्ताहिक CCBK च्या भागात अमोल कऱ्हाडकर, आदित्य जोशी आणि अमोल गोखले पूर्वावलोकन करत आहेत वेस्ट इंडिज दौऱ्याचं...

Jul 11, 202318 min

How Devika Vaidya fell in love with cricket all over again ?

१७ वर्षांची असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण. १९ व्या वर्षी संघातून वगळले जाणे. आणि त्यातच आईचं अचानक झालेलं निधन. या धक्क्यांमधून सावरून क्रिकेटमधील रस गमावलेली देविका वैद्य पुन्हा मैदानावर यायला लागली आणि गेल्या वर्षी तिने भारतीय संघात पुनरागमन देखील केलं. तिच्या खडतर काळाबद्दल, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसऱ्या खेळीबद्दल व WPL मध्ये जाणवलेल्या 'प्राईस टॅग प्रेशर' बद्दल मारूया गप्पा देविकाशी 'CCBK स्पेशल' मध्ये. She became an international cricketer at 17, was dropped from India's squad even before she turned 19. Then came the toughest phase of her life, with sudden demise of her beloved mother. In a challenging phase, Devika Vaidya had stopped the urge to step on to the field. Since then, not only has she returned to the field but also stormed into India's squad in white-ball formats. In a candid chat, Devika reveals how she fell in love with cricket all over again and how she handled the price-tag pressure during the inaugural edition of the Women's Premier League.

Jul 8, 202322 min

MPL २०२३ ने काय साध्य केलं ?

Maharashtra Cricket Association president Rohit Pawar revived the Maharashtra Premier League (MPL) and the tournament was a success. In this episode of Saaptahik CCBK, Amol Gokhale analyzes the tournament, how icon players like Kedar Jadhavm Ruturaj Gaikwad, and Rahul Tripathi fared, the emerging players like Vijay Pawale and Arshin Kulkarni and what made Ratnagiri Jets so special to watch… महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवारांनी महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) पुन्हा सुरु केली आणि स्पर्धेला यश आलं. साप्ताहिक CCBK च्या ह्या भागात अमोल गोखले आढावा घेणार आहे एकंदरीत स्पर्धेचा, केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी सारख्या यकॉन खेळाडूंच्या कामगिरीचा, विजय पावले आणि अर्शिन कुलकर्णी सारखा उभरत्या खेळाडूंच्या कामगिरीचा आणि रत्नागिरी जेट्स मध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी त्यांना खेळताना बघताना आनंद देते...

Jul 4, 202312 min

Rohit Pawar यांचा MPL, World Cup बद्दल विशेष interview

Maharashtra Premier League पुन्हा एकदा चालू करून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष रोहित पवार यांनी दमदार सलामी दिली आहे. ती स्पर्धा चालू असतानाच वर्ल्ड कप २०२३ चं वेळपत्रक जाहीर झालं, आणि पुण्याला भारताच्या सामन्यासह तब्बल पाच सामने मिळाले आहेत. MPL पुढे जाऊन कशी मोठी करता येईल, खेळाडूंच्या करारासंदर्भात काही करता येईल का, आणि अर्थातच घराणेशाही अशा सगळ्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं रोहित पवार यांनी अमोल कऱ्हाडकरशी मारलेल्या गप्पांमधून दिली आहेत.Rohit Pawar took over the reins of the Maharashtra Cricket Association (MCA) in January 2023. Since then, not only has the MCA relaunched the Maharashtra Premier League (MPL) but has also been awarded five games of the ICC Men’s World Cup 2023, including Team India’s game against Bangladesh. Pawar, the MCA President, shares his passion for the sport, dynasty politics and his vision for Maharashtra cricket, in this exclusive conversation with Amol Karhadkar in 'CCBK Special'.

Jul 4, 202312 min

India vs Pakistan मेगा मॅच Ahmedabad मध्ये

ICC च्या भारतात होणा-या वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. दहा शहरांमध्ये मुख्य सामने आणि दोन शहरांमध्ये सराव सामने होणार आहेत. ५ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये गतविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्याने शुभारंभ होईल. भारत विरूद्ध पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणार आहे. मुंबई आणि पुण्याला पाच सामने मिळाले असून नागपूरमध्ये एकही सामना होणार नाहीये. ICC ची मोठी स्पर्धा सात वर्षांनी भारतात होत आहे. दहा संघांच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ एकमेकांविरूद्ध एकदा खेळून चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. The much awaited schedule of ICC Cricket World Cup was finally announced in Mumbai. Opening match will take place on 5th October between defending champions England and New Zealand. Final will be played on 19th November. Arch Rivals India-pakistan match will be played on 15 th October. All three important matches are scheduled to be played in Ahemdabad’s Narendra Modi cricket stadium. Main matches will be played across 10 cities and 2 cities will host practice matches. ICC is conducting mega event in India after 7 years. 10 teams will play each other once and best 4 teams will be qualified for Semi Finals.

Jun 28, 20234 min

Milind Kanmadikar recalls witnessing history at Lord's on 25 June, 1983

जागतिक क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यास कारणीभूत ठरलेल्या 'त्या' सामन्याला २५ जून, २०२३ ला तब्बल ४० वर्षं पूर्ण होत आहेत. १९८३ वर्ल्ड कपचा भारत आणि वेस्ट इंडिजमधील खेळला गेलेला अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावरून 'याचि देही, याचि डोळा' पाहिलेले मिलिंद कनमाडीकर - ज्यांचे वडिल अनंत कनमाडीकर हे तेव्हा BCCI चे सचिव होते - सांगत आहेत अंतिम सामन्याच्या त्यांच्या आठवणी.It's the 40th anniversary of the match that changed the game of cricket forever. Exactly four decades since Kapil's Devils defeated the mighty West Indies in the 1983 World Cup final at Lord's on June 25, 1983, Milind Kanmbadikar - son of then BCCI secretary Anant Kanmadikar - recalls watching the game from the Members' stand at the iconic stadium.

Jun 25, 202310 min

Pujara व Umesh Yadav ला टाटा, Yashasvi व Ruturaj ला संधी मिळेल आता ?

पुजारा व उमेशला टाटा, यशस्वी व ऋतुराजला संधी मिळेल आता? वेस्ट इंडिज दौ-यासाठी भारताच्या टेस्ट व ODI संघांची घोषणा झाली आहे. छोटे का असेना, बदलांना सुरूवात झाली आहे. एका तपाहून जास्त भारताची एक बाजू लावून धरणारा चेतेश्वर पुजाराला मिळालेला डच्चू, यावरून तो अखेरची टेस्ट मॅच खेळला आहे असं गृहित धरायला हरकत नाही. उमेश यादवचा भारतातला रेकॉर्ड चांगला असला, तरी परदेशात त्याला विकेट मिळत नाहीत, त्यामुळे त्याचाही या दौ-यासाठी विचार झालेला नाही. ऋतुराज गायकवाड किंवा यशस्वी जयस्वाल यापैकी एक जण वेस्ट इंडिजमध्ये कसोटी पदार्पण करणार, हे निश्चित आहे. त्याचप्रमाणे एकदिवसीय संघनिवडीमधून वर्ल्ड कपच्या संघाचे संकेत मिळत आहेत. या सगळ्याचा आढावा आपल्यासमोर घेऊन येत आहे आदित्य जोशी. Cheteshwar Pujara and Umesh Yadav have been dropped from India's squad for the Test series in the West Indies. Mohammed Shami has been rested. And the likes of Ruturaj Gaikwad, Yashasvi Jaiswal and Mukesh Kumar have been included in the 16-member squad for the two-Test series. Does this mean that the national selection committee has set the succession plan in place? Besides the Test squad, does the ODI squad give a clear indication about India's core of 20 players for the 2023 World Cup? Aditya Joshi gives an insight into the squad selection.

Jun 24, 202311 min

भारताच्या Test match टीम साठी succession plan आवश्यक

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप च्या अंतिम सामन्यापर्यंत दोन वेळा मजल मारूनही जिंकण्यात अपयशी ठरलेली टीम इंडिया वेस्ट इंडिजविरूद्ध १२ जुलैपासून पुढची टेस्ट खेळणार आहे. सातत्याने अपयशी ठरणारे फलंदाज, वय होत चाललेले फिरकी गोलंदाज आणि सारखे दुखापतग्रस्त होणारे वेगवान गोलंदाज लक्षात घेतले तर आता पुढची फळी तयार करण्याची वेळ नक्कीच आली आहे. निवड समितीची अवघड निर्णय घेण्याची तयारी आहे का? कोणते खेळाडू सध्याच्या खेळाडूंची जागा घेऊ शकतात? याची सविस्तर चर्चा 'साप्ताहिक CCBK' मध्ये आपल्यासमोर घेऊन येत आहेत आदित्य जोशी आणि अमोल क-हाडकर. Despite making it to the World Test Championship twice in as many editions, India haven't been able to lift the mace. Considering the loss of form of senior batters, spin duo's age and an injury-prone pace pack, it's time for the national selectors to blood youngsters into the Test set-up for the series in the West Indies, starting July 12. Aditya Joshi and Amol Karhadkar weigh in on potential replacements in 'Saaptahik CCBK'

Jun 20, 202315 min

Vijay Pawle: कोकण ते MPL via सांगली & शारजा...

Vijay Pawale is an undisputed star in the world of tennis ball cricket, so much so that he has even played an India-Pakistan tennis ball game in Sharjah. His cricketing journey began in Konkan and has come full circle with a stint in the Maharashtra Premier League (MPL) with a team in Konkan - Ratnagiri Jets. Vijay takes us into an enthralling world of tennis ball cricket in a captivating candid conversation with Amol Gokhale in this CCBK special… विजय पावले हा टेनिस बॉल क्रिकेट जगतातला सुपरस्टार खेळाडू आहे. किती मोठा, माहितेय? तो शारजामध्ये भारत पाकिस्तान सामना खेळला आहे. कोकणातील छोट्या खेड्यापासून सुरु झालेला टेनिस बॉलचा प्रवास आज महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्यंत आलेला आहे आणि कोकणच्या मातीतला हा खेळाडू कोकणच्याच रत्नागिरी जेट्स कडून लेदर बॉल क्रिकेट खेळतो आहे. अमोल गोखले बरोबर त्याने च्या ह्या विशेष भागात दिलखुलास गप्पा मारत टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व उलगडून दाखवलं आहे..

Jun 19, 202321 min

Ankit Bawane च्या MPL आठवणी आणि त्याची कोल्हापुरातील सर्वात आवडती गोष्ट

Maharashtra Ranji captain Ankit Bawne is ready to get going for Kolhapur Tuskers in Maharashtra Premier League (MPL). Tuskers are stacked with big hitters like Bawne, icon player Kedar Jadhav and MPL’s most expensive player, Naushad Shaikh, and young guns like Sahil Autade and Sachin Dhas. Amol Gokhale had a candid conversation with Ankit Bawne in 'CCBK Special' on the sidelines of the team’s practice session in Pune about memories of previous MPL, playing for the Kolhapur team, and what he loves the most about the city of Kolhapur. महाराष्ट्राचा रणजी संघाचा कर्णधार अंकित बावणे महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) मध्ये कोल्हापूर टस्कर्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. अंकितच्या जोडीला संघात आयकॉन खेळाडू म्हणून केदार जाधव तर आहेच पण MPL च्या लिलावातील सर्वाधिक किमतीचा नौशाद शेख देखील आहे. ह्या अनुभवी खेळाडूंच्या जोडीला सचिन धस आणि साहिल औताडे असे युवा खेळाडूदेखील आहेत. CCBK च्या ह्या विशेष भागात अमोल गोखलेने अंकितशी गप्पा मारल्या आहेत MPL बद्दल. अंकित सांगत आहे त्याच्या MPL च्या जुन्या आठवणी, कोल्हापूरकडून खेळतानाच्या भावना आणि कोल्हापूरबद्दलची आवडती गोष्ट.

Jun 14, 202310 min

Saaptahik CCBK, Team India घेईल ह्यातून धडे का पहिले पाढे पंचावन्न?

Shubman Gill’s ‘inconclusive’ catch dismissal has become the big talking point of the World Test Championships (WTC) Final between India and Australia. Did India really lose the game at that point? The clear answer is No. But, did India lose the plot and the match on the first day itself? Did the team err in selection? But now the more significant and obvious question is ‘What Next?’ Amol Karhadkar, Aditya Joshi, and Amol Gokhale analyze the WTC Final in this episode of Saaptahik CCBK… शुबमन गिलचा वादग्रस्त झेल हा भारत आणि ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्यातील मोठा चर्चेचा मुद्दा ठरला आहे. पण भारताने नक्की ह्या एका निर्णयावर सामना गमावला का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. सामन्यासाठी संघ निवड योग्य होती का? आणि पहिल्या दिवशी जेव्हा संघ पिछाडीवर गेला तेव्हाच सामना हातातून निसटला होता का? आणि त्याहून कळीचा प्रश्न म्हणजे, आता पुढे काय? साप्ताहिक CCBK च्या ह्या भागात अमोल कऱ्हाडकर, आदित्य जोशी आणि अमोल गोखले WTC फायनलचं विश्लेषण करत आहेत..

Jun 12, 202318 min

MPL साठी प्रेक्षकांइतकेच खेळाडू पण उत्सुक

Maharashtra Premier League (MPL) is making a comeback after 2011 and it has piqued the interest of cricket lovers in the state. CCBK’s Amol Gokhale was able to attend the player auction and got insights into the proceedings. Which players were most sought after? How are teams stacked up? He also spoke to players and stakeholders and even they were just as excited as fans to get going with MPL... महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) २०११ नंतर पुन्हा सुरु होत आहे आणि ही जणू नवीन स्पर्धा आहे असाच उत्साह चाहत्यांमध्ये आहे. CCBK चा सदस्य अमोल गोखले खेळाडूंच्या लिलावास उपस्थित होता आणि त्यानी लिलावाची पडद्यामागची दुनिया अनुभवली म्हणजेच behind the scenes access . कुठल्या खेळाडूंना सर्वाधिक मागणी होती? सहा संघानी त्यांची बांधणी कशी केली आहे? आणि एक गोष्ट नक्की: प्रेक्षक जितके MPL साठी उत्सुक आहेत, तितकेच खेळाडू देखील जून १५ची आतुरतेने वाट बघत आहेत.

Jun 7, 202311 min

Saaptahik CCBK, Team India संपवेल का ICC ट्रॉफीचा दुष्काळ?

The World Test Championships final is upon us. India have made it to yet another final and face mighty Australia at the Oval in London for the coveted ICC mace. Who will be India’s third seamer? Will it decide whether or not India fields two spinners or goes with the extra pacer? Cheteshwar Pujara holds the aces for stalwart Indian batting lineup. Kangaroos look favourite on paper but will the lack of match practice come to haunt them in crucial moments? Amol Karhadkar, Aditya Joshi and Amol Gokhale preview the WTC final in this episode of Saaptahik CCBK… भारत आणि ऑस्ट्रेलिया ह्यांचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना काही तासांवर येऊन ठेपला आहे. सोमवारी झालेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये संघ निवडीबद्दल मौन बाळगलं गेलं. पण भारत चौथा वेगवान गोलंदाज खेळवणार का दोन फिरकी गोलंदाज खेळवणार हा एकमेव कळीचा मुद्दा आहे. कौंटी क्रिकेट खेळणाऱ्या चेतेश्वर पुजारा भारतीय फलंदाजीचा कणा असेल. कागदावर ऑस्ट्रेलियाचा संघ बलाढ्य वाटतो आहे पण त्यांचे काही प्रमुख खेळाडू गेला काही काळ स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहेत, त्याचा त्यांना फटका बसू शकतो का? अमोल कऱ्हाडकर, आदित्य जोशी आणि अमोल गोखले ह्या अंतिम सामन्याचं पूर्वावलोकन म्हणजेच प्रिव्हू साप्ताहिक CCBK मध्ये..

Jun 6, 202322 min

India आणि Australia चा WTC final पर्यंतचा प्रवास

दोन वर्षांपूर्वी न्यूझीलँड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हरल्यानंतर भारताने तिथेच इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा WTC फायनल गाठायची तयारी सुरु केली. पण त्या दोन वर्षात बरंच काही बदललं आहे. विराट कोहली-रवी शास्त्री ह्यांच्या ऐवजी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड ह्यांच्याकडे संघाची धुरा आहे. अनेक प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे अनुपलब्ध आहेत, पण तश्या परिस्थितीत देखील भारताने ऑस्ट्रेलियावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी वर आपलं नाव कोरून इंग्लंड वारी पक्की केली. आणि आता मानाच्या विजेतेपदासाठी भारताचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी इंग्लंडच्या वातावरणात होणार आहे. पण त्याआधी CCBK च्या ह्या विशेष भागात अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले भारत आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोन्ही संघांचा द ओव्हल, लंडन पर्यंतचा प्रवास... India began their second journey towards the World Test Championships (WTC) final in England, on the back of the loss in the inaugural WTC final. Two years later, India face Australia for the coveted trophy. Much has changed in those two years, from India visiting neighbours Bangladesh to the Rohit Sharma-Rahul Dravid duo at the helm instead of Virat Kohli & Ravi Shastri. Similarly, under the leadership of Pat Cummins, Aussies have become a force to reckon with and have stormed to the WTC final, despite losing the Border-Gavaskar Trophy to India just a couple of months back. In this WTC finals curtain raiser, Amol Karhadkar and Amol Gokhale look at India’s and Australia’s road to the Oval, London.

Jun 2, 202310 min

MS Dhoni चा करिष्मा आणि CSK ची पुन्हा विजयला गवसणी

वीस षटकांचा सामना ज्याला मराठी मध्ये T२० म्हणतात, तो सामना तब्बल तीन दिवस चालला. तमाम भारतीयांच्या मनात जी धाकधूक होती की हा महेंद्र सिंह धोनीचा शेवटचा IPL सामना ठरेल का?, पण ती भीती 'थालाने' तूर्तास निराधार ठरवली आहे. वर दुग्धशर्करा योग म्हणून चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा IPL चे विजेतेपद पटकावले. गुजरात टायटन्सने त्यांचं गेल्यावर्षीचं यश निर्भेळ होतं हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. शुबमन गिलची फलंदाजी बघून क्रिकेटप्रेमी नक्कीच सुखावले असणार आहेत. चाहत्यांना धोनीला फलंदाजी करताना बघता यावं म्हणून ज्या रवींद्र जाडेजानी बाद व्हावं असं वाटत होतं, त्याच जाडेजाने चेन्नईला IPL विजेतेपद मिळवून दिलं. IPL च्या ह्या आणि अशा अनेक पैलूंवर अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले चर्चा करत आहेत CCBK च्या ह्या विशेष भागात... No one imagined that the IPL 2023 final would last three days. At the end of it, the ‘announcement’ did not come from MS Dhoni, but we all saw him lift the IPL trophy for the fifth time. Led by Hardik Pandya, Gujrat Titans wore hearts on their sleeves and were a worthy match for Chennai Super Kings in the final. Indian cricket fans’ hearts will surely go out to the new superstar on the horizon — Shubman Gill. For the first 16 games, fans wanted Ravindra Jadeja to get out cheaply but in the wee hours of Monday, they all prayed that he would finish things off in style. In this truly special episode of CCBK, Amol Karhadkar and Amol Gokhale take a deep dive into the IPL season that was and MSD’s magical CSK…

May 30, 202324 min

Gill ने केलं Mumbai Indians ला गारद, कोण जिंकणार IPL final?

गुजरात टायटन्सने IPL २०२३ च्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर विजय मिळत मुंबई इंडियन्सला प्लेऑफ्समध्ये पोहोचवलं. त्या सामन्यात शतक झळकावून मुंबई इंडियन्सचा लाडका झालेल्या शुबमन गिलने “तुम आए नही लाए गये हो” या हिंदी सिमेनाच्या डायलॉग प्रमाणे मुंबईच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. मोहित शर्माने देखील ५ बळी टिपत सामना गुजरातच्या हातून कधीच निसटणार नाही ह्याची खात्री केली. मुंबई नक्की कुठे कमी पडली? IPL २०२३ चा सलामीचा व अंतिम सामना आता चेन्नई विरुद्ध गुजरात होणार आहे. ह्या सामन्यात कुठल्या बाबींवर यंदाचा विजेता ठरेल ह्या गोष्टींचा आढावा घेत आहेत आदित्य जोशी आणि अमोल गोखले, CCBK च्या विशेष भागात. Gujarat Titans' win in the last league match of IPL 2023 against Royal Challengers Banglore allowed Mumbai Indians to sneak through to the Playoffs. Shubman Gill scored a fantastic century in that match and Mumbai Indians fans were in awe of his talent. The same Shuman Gill destroyed Mumbai Indians attack in the second qualifier and took Gujarat Titans to their second consecutive IPL final. Aditya Joshi and Amol Gokhale analyse the game and predict the outcome of the tantalising final between Chennai Super Kings and Gujarat Titans

May 27, 202314 min

दसनंबरी CSK; MI करेल का पुन्हा गुजरातवर दादागिरी ?

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सनी ते IPLच्या ईतिहासातील सर्वात यशस्वी संघ का आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नईने गतविजेत्या गुजरातला हरवून पुन्हा एकदा IPLची अंतिम फेरी गाठली. रोहित शर्माच्या मुंबईने कृणाल पांड्याच्या लखनौला एलिमिनेटर मध्ये पाणी पाजलं, आणि आता त्यांचं लक्ष्य हार्दिक पांड्याचा संघ असेल. CCBKचा हा विशेष भाग घेऊन येत आहेत अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले... Chennai Super Kings and Mumbai Indians showcased why they’re the most successful teams in the history of the Indian Premier League. MSD’s CSK defeated the defending champions Gujarat Titans to reach their 10th IPL final. Meanwhile, Rohit Sharma’s MI Paltan thrashed Krunal Pandya’s Lucknow in the eliminator and will now look to do the same to Hardik Pandya’s team. Amol Karhadkar and Amol Gokhale take stock of things in this CCBK special…

May 26, 20239 min

CCBK Saaptahik, RCB ची हार, ग्रीन ठरला MI चा तारणहार, कोण असेल Chennai मध्ये सुपरस्टार?

Playoffs for the Indian Premier League (IPL) 2023 are set. It’s GT vs CSK & LSG vs MI first up. Hardik Pandya’s Gujarat Titans take on MS Dhoni’s Chennai Super Kings in their own den. Who will come out on top? Does Rohit Sharma get enough credit for reaching playoffs with this bunch of bowlers? And what about stand-in skipper Krunal Pandya guiding Lucknow Super Giants to playoffs?One feels sorry for Virat Kohli and Royal Challengers Banglore (RCB) for missing out… On playoffs and the IPL trophy. Amol Karhadkar, Aditya Joshi and Amol Gokhale in a candid conversation in this episode of Saaptahik CCBK… IPL प्लेऑफ्स चे चार संघ अखेरीस ठरले. हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्स भिडणार आहे 'कॅप्टन कूल' महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला चेन्नईमध्ये. कोण जाईल थेट अहमदाबादला अंतिम सामन्यात? रोहित शर्माला त्याच्या कर्णधारपदाबद्दल पुरेसं श्रेय दिलं जातं का? तीच गोष्ट कृणाल पांड्याची. नेहमीच्या कर्णधाराच्या गैरहजेरीत त्यांनी लखनौचं नेतृत्व कौशल्याने केलं आहे.आणि हो, विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी वाईट वाटणं स्वाभाविक आहे.साप्ताहिक CCBK चा हा भाग घेऊन येत आहेत अमोल कऱ्हाडकर, आदित्य जोशी आणि अमोल गोखले..

May 22, 202318 min

CCBK Special, Who will join Gujarat Titans in IPL Playoffs

With just five games to go in the league stage, the Indian Premier League (IPL) playoffs scenario is still unclear. CSK and LSG will make it to the playoffs with a win. But, for Rohit Sharma’s Mumbai Indians and Virat Kohli’s Royal Challengers Banglore, it’s not so straightforward. They can qualify as high as second or can go home on Net Run Rate, even if they win their last game. Amol Karhadkar, Aditya Joshi and Amol Gokhale break it down match-by-match, outcome by outcome in this CCBK Special

May 19, 202317 min

Gujarat Titans प्लेऑफ्स मध्ये; Delhi करतील का CSK चा पत्ता कट?

इंडियन प्रीमियर लीगच्या साखळी फेरीत ८ सामने उरले आहेत. प्लेऑफ्समधील एकच जागा निश्चित झाली आहे. उर्वरित तीन जागांसाठी सात संघ धडपडत आहेत. प्रत्येक संघाची 'बिझनेस एंड' मधील परिस्थिती कशी आहे ह्याचा आलेख घेऊन येत आहेत अमोल गोखले व अमोल कऱ्हाडकर 'साप्ताहिक CCBK' मध्ये Only eight matches remain in the Indian Premier League's first stage. With Gujarat Titans being the only team to have qualified for the Playoffs, seven teams are vying for the other three spots up for grabs. Amol Gokhale and Amol Karhadkar give a lowdown on what each team has in store at the business end of the league stage

May 16, 202316 min

CCBK Special, चलाख चहल IPL's poster boy

IPL मध्ये पहिल्या तीन सीझनमध्ये मिळून एक सामना, रणजी टीममध्ये देखील भरपूर फिरकी गोलंदाज असल्याने तिथेही तुरळक संधी. पण २०१४ मध्ये विराट कोहलीच्या बंगळुरूने युजवेंद्र चहलला घेतलं आणि चिन्नस्वामी स्टेडियममध्ये त्याने पुढची काही वर्ष धुमाकुळ घातला. २०२० मध्ये झालेल्या मोठ्या ऑक्शनमध्ये तो राजस्थान रॉयल्सकडे गेला आणि आता IPL मधील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज झाला आहे. नुकतंच त्याने ड्वेन ब्राव्होला मागे टाकलं आहे. रीलस्टरपासून सुरू झालेला त्याचा प्रवास सर्वाधिक विकेट टेकर पर्यंत कसा झाला हे सांगत आहे आदित्य जोशी CCBKच्या विशेष भागात.. In his first three seasons as an IPL player, Yuzvendra Chahal was in the playing XI once. He barely got any opportunities with his Ranji Trophy team - Haryana. In 2014, he was picked by Virat Kohli's Royal Challengers Bangalore (RCB) and things turned around. He conquered a batting paradise wicket and small boundaries of M Chinnaswamy stadium and how. He rapidly rose through the ranks and became Kohli's go-to man. Lining up alongside R Ashwin, Chahal took Rajasthan Royals to the IPL finals last year and in the IPL 2023, he moved past Dwayne Bravo to become the highest wicket taker in the competition's history. Aditya Joshi talks about this bowling start on the field and social media star off it, in this episode of CCBK special...

May 13, 202310 min

Rohit Sharma, Prithvi Shaw, Harry Brook: IPL 2023 चे flop शो

नाव मोठं लक्षण खोटं ही म्हण यंदाच्या IPL मधली काही खेळाडूंच्या कामगिरीला चपखल बसते. स्पर्धा सुरु होण्याआधी त्यांच्याकडून साहजिकच खूप अपेक्षा होत्या, पण त्यांनी घोर निराशा केली आहे. साप्ताहिक CCBKच्या ह्या भागात अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले नी आढावा घेतला आहे अश्या पाच खेळाडूंचा ज्यांची कामगिरी IPL २०२३ मध्ये अत्यंत सुमार आहे... There are certain players whose reputation precedes them but it’s not always they live up to the billing. This holds true in the case of a few players in IPL 2023, whose performances have been utter disappointments. In this episode of Saaptahik CCBK, Amol Karhadkar and Amol Gokhale analyse the situation and name five players who can be called ‘flops’ this season...

May 9, 202311 min

IPL २०२३ मधील चिरतरुण खेळाडू | Ageless wonders of IPL 2023

वय का केवळ एक आकडा आहे असं कुठलाही खेळाडू कायम म्हणतो. आणि ह्या IPL मध्ये हे वारंवार सिद्ध करून दाखवलं आहे एखाद-दुसऱ्या नव्हे तर चार गोलंदाजांनी. ह्या चारही गोलंदाजांना IPL पासून काही काळासाठी दूर जावं लागलं होतं, आणि असं वाटत होतं की ह्या खेळाडूंचं IPL मधलं 'करिअर' आता संपुष्टात आलं आहे, पण त्यांनी दिमाखदार कामगिरी करून आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे. CCBK च्या विशेष भागात अमोल कऱ्हाडकर सांगतो आहे की हे चार कुठले दिग्गज आहेत... “Age is just a number,” an athlete often says. This has been proved right time and again this IPL by not any batter or so but by four bowlers. They were away from the IPL for the time being and it looked certain that their IPL career was ‘over’. However, defying the odds, these four giants of the game are doing exceptionally well in this IPL. In this CCBK Special, Amol Karhadkar talks about these miracle men…

May 6, 202312 min

Virat Kohli आणि Gautam Gambhir च्या वादाला Naveen वळण

IPL आणि वादंग हे पक्कं समीकरण आहे. २०२३ आत्तापर्यंत अपवाद ठरलं होतं. पण लखनौमध्ये दिल्लीचे दोन वीर एकमेकांना भिडले आणि क्रिकेटचं मैदान कुस्तीचा आखाडा होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. विराट कोहली आणि गौतम गंभीरबरोबर अमित मिश्रा, नवीन उल हक, केएल राहुलसुद्धा याचा भाग होते. कोहली-गंभीर वादाला आत्ता नाही, तर २०१३ पासून सुरूवात झाली आहे. लखनौमध्ये त्याचा भडका उडाला. या सगळ्या वादाची आतली खबर आपल्यासमोर घेऊन येत आहे अमोल कऱ्हाडकर Virat Kohli and Gautam Gambhir having a go at each other is nothing new but the dispute between the Delhi duo almost went out of control after the indian Premier League tie between Royal Challengers Bangalore and Lucknow Super Giants in Lucknow. Amol Karhadkar presents the details about the events and the background of the dispute

May 3, 202311 min

मुंबईच्या Yashaavi Jaiswal आणि Tushar Deshpande चा IPL मध्ये करिष्मा

साप्ताहिक CCBK च्या ह्या भागात आदित्य जोशी आणि अमोल गोखलेच्या चर्चेला 'मुंबईच्या' खेळाडूंखेरीज कुठला अजून चांगला विषय नव्हता. IPL च्या ९९९ आणि १,०००व्या सामन्यात मुंबईकर तुषार देशपांडे आणि यशस्वी जैस्वालनी अनुक्रमे पर्पल आणि ऑरेंज कॅप मिळवली. परंतु वैयक्तिक कामगिरी उत्तम करून देखील त्यांच्या संघाना पराभव स्वीकारावा लागला. मुंबई आणि राजस्थान सामना गाजला खरा, पण जोफ्रा आर्चरच्या बेल्जियम वारी इतका नाही. This episode of Saaptahik CCBK talks about ‘Mumbai’ players. But Aditya Joshi and Amol Gokhale had no other option. In IPL’s 999th and 1000th games, two Mumbaikars — Tushar Deshpande and Yashasvi Jaiswal — reached personal milestones but their teams suffered losses. This landmark IPL game is now part of IPL classics.

May 2, 202314 min

Rohit Sharma, the India Captain, turns 36

CCBK परिवाराकडून भारतीय कर्णधार रोहित शर्माला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! रोहितच्या खास दिवसानिमित्त आम्ही त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड, संघातील सहकारी ह्यांनी सांगितलेल्या रोहितच्या आठवणींना उजाळा दिला आहे. Rohit Sharma is 36. We have compiled a video of memories narrated by his coach Dinesh Lad and his teammates. We wish you a happy birthday, skipper!

Apr 30, 20237 min

IPL खरंच फिक्स असतं ??? नक्की काय होत स्पॉट फिक्सिंग प्रकरण

१६ मे आणि IPL मध्ये वादंग याचं काहीतरी कनेक्शन आहे. SRK ची वानखेडेवर २०१२ साली झालेली गडबड आणि २०१३ साली १६ मेच्या रात्री दिल्ली पोलिसांनी वानखेडेवर येऊन केलेली स्पॉट फिक्सींगची कारवाई हादरवून टाकणारी होती. वर्ल्ड कप विजेत्या संघातील श्रीसंत, अंकित चव्हाण, अजित चंढेला यांना आणि नंतर बीसीसीआयचे पदाधिकारी श्रीनिवासन यांचा जावई मय्यप्पन यांना झालेली अटक फिक्सिंगविषयी सगळ्यांच्या मनात संशय निर्माण करून गेली. हे सगळ प्रकरण आणि त्याचा शेवट कशाने झाला हे आपल्याला सांगत आहे आदित्य जोशी.. 16th May and IPL controversy go hand in hand. SRK controversy happened on 16th May 2012. One year later same date, IPL’s biggest controversy broke out when Delhi Police arrested Sreesanth, Ajit Chandhila, Ankit Chavan after Mumbai Indians and Rajasthan Royals match. This arrest was followed by the arrest of Mayyapan who was son in law of then BCCI supremo Srnivisan. The whole controversy kept getting headlines for considerable time to come. Aditya Joshi is telling us how this culminated into banning of 2 IPL franchises.

Apr 27, 20239 min

Saaptahik CCBK, रहाणेची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी निवड योग्य आहे?

अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात पुनरागमन केलं. त्याची IPL मधली (का रणजी मधली) कामगिरी आणि इतर खेळाडूंना झालेल्या दुखापती बघता ही निवड फारशी धक्कादायक नाही. पण कळीचा मुद्दा हा की ही निवड 'अंतिम सामन्यापुरती' अल्पजीवी ठरेल का, चेतेश्वर पुजारा प्रमाणे रहाणेला पण एकसलग संधी मिळणार? तितकाच चर्चेचा मुद्दा म्हणजे महेंद्र सिंह धोनीने निवृत्तीचे दिलेले संकेत. साप्ताहिक CCBKच्या ह्या भागात अमोल द्वयीने ह्या आणि इतर मुद्द्यांवर चर्चा केली आहे. It’s not the biggest of surprises that Ajinkya Rahane has made a comeback in the Indian side for the World Test Championships final. His recent IPL exploits (or Ranji), injuries to first-choice players, and his experience probably warrant his selection. But the key issue here is whether this selection is ‘only’ with the final in mind or should he be backed like Cheteshwar Pujara was backed last time? MS Dhoni has given a clear hint that he might soon hang up his boots. In this episode of Saaptahik CCBK, Amol Karhadkar, and Amol Gokhale shed light on these hot topics.

Apr 25, 202317 min

CCBK Special, अर्जुन तेंडुलकर आणि ट्रोलिंग

त्याने सामन्यात महत्वाच्या क्षणी अप्रतिम यॉर्कर टाकून संघाला बळी मिळवून दिला, त्यानंतर अजून एका महत्वाच्या क्षणी मात्र त्याच्या षटकात प्रतिस्पर्ध्यांनी खूप धावा कुटल्या, संघ हरला. त्यानंतर त्याला समाजमाध्यमांमध्ये 'ट्रोल' करण्यात आलं. त्याने शेवट पर्यंत संघाला विजय मिळवून देण्यासाठी फलंदाजी केली. असं वाटलं कि तो एकटा संघासाठी लढतो आहे, आणि विजय अगदी हातातोंडाशी आला आहे. पण अखेरच्या क्षणी तो बाद झाला, आणि अर्थात, संघ हरला. त्यानंतर त्याला समाजमाध्यमांमध्ये 'ट्रोल' करण्यात आलं. ह्या दोन गोष्टी नुकत्याच घडलेल्या IPL सामन्यांबद्दल आहेत, त्या कोणाबद्दल आहेत हे देखील तुम्ही ओळखलं असेल.CCBKच्या ह्या विशेष भागात आदित्य जोशी टिपण्णी करत आहे एकंदरीत मिम कल्चर, ट्रोलिंग, त्याचा खेळाडूंवर होणार परिणाम आणि अर्जुन तेंडुलकरला केवळ 'सचिन तेंडुलकरचा मुलगा' ह्या चष्म्यातून बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल... He gave his side a wicket at a vital point in the game but later conceded plenty of runs in one over. His team lost and he was ‘trolled’ on social media.He batted throughout the innings to take his side close to a win. He did the bulk of the scoring but was dismissed at a crucial point. His team lost and he was ‘trolled’ on social media.These two stories are from recent IPL games and I am sure you’ve guessed correctly, who we are referring to.In this CCBK special episode, Aditya Joshi talks about Meme culture, trolling, the toll it takes on the players, and people judging Arjun Tendulkar only as a son of Sachin Tendulkar…

Apr 23, 20238 min