
Sports कट्टा
507 episodes — Page 7 of 11

S5 Ep 68CCBK at Edgbaston: Will Bumrah be India's saviour against England?
दोन नवे कर्णधार, दोन नवे प्रशिक्षक. परंतु मालिका मात्र तीच. भारत मालिका जिंकायच्या उंबरठ्यावर असताना बुमराहच्या संघापुढील आव्हाने आपल्यासमोर मांडत आहेत थेट एजबॅस्टन मैदानातून गौरव जोशी व सुनंदन लेले

S5 Ep 67Chandrakant Pandit's recipe for success in Ranji Trophy
मध्य प्रदेशला पहिलंवहिलं रणजी ट्रॉफी अजिंक्यपद मिळवून देणाऱ्या चंद्रकांत पंडितांना मानाचा मुजरा देत असतानाच 'साप्ताहिक CCBK' मध्ये पाहूया ह्या विजयाचं भारतीय देशांतर्गत क्रिकेटसाठी असलेलं महत्त्व. आणि अर्थात सुनंदन लेले आयर्लंडमधून पहिल्या T२० सामन्यानंतर हार्दिक पंड्याने विरोधी संघातील खेळाडूला दिलेल्या 'सरप्राईझ गिफ्ट' बद्दल आणि ऋतुराज गायकवाडच्या फिटनेसबद्दल ताजी बातमी देत आहेत.

S6 Ep 32Meet Chirag Patil, a failed cricketer but a genuine cricket fan
नसानसांत क्रिकेट भिनलेल्या कुटुंबात जन्माला येऊनही त्याला लहानपणी क्रिकेटने झपाटलं नाही. योगायोग पहा, चिराग पाटीलच्या दशकभरातील कलाकाराच्या प्रवासातील सर्वात प्रसिद्ध भूमिका मात्र एका क्रिकेटरची - तीदेखील त्याच्या वडिलांची - ठरली. चिराग जरी क्रिकेटवेडा नसला तरी "क्रिकेटचा किडा" नक्की आहे.

S5 Ep 66Saaptahik CCBK, Is Karthik frontrunner for T20 keeper's role? Can Pandit-Patidar stop Mumbai's Ranji juggernaut?
भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेतील सकारात्मक व नकारात्मक मुद्द्यांची चर्चा करतानाच 'साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर मारत आहेत गप्पा रणजी ट्रॉफी अंतिम सामन्याबद्दल. चंद्रकांत पंडित चालू ठेवतील त्यांची छोट्या संघांबरोबरील घोडदौड मध्य प्रदेशला विजेतेपद मिळवून देऊन? का मुंबईचा संघ 'पंडित फॅक्टर' बाजूला ठेवून त्यांचे ४२ वे अजिंक्यपद पटकावतील?

S6 Ep 38My Memorable Ranji Trophy Season - Vinayak Samant (2006-07) - Part 2
रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात यशस्वी ठरलेल्या यष्टीरक्षकांमध्ये विनायक सामंतचे नाव घेतले जाते. मुंबईसाठी खेळायच्या आधी आसामचं प्रतिनिधित्व करूनही सामंतने मुंबई क्रिकेटवर स्वतःची छाप सोडली आहे. 'माझा संस्मरणीय रणजी हंगाम' या मालिकेत पाहूया विनायकच्या २००६-०७ सीझनच्या आठवणी. भाग पहिला

S6 Ep 37My Memorable Ranji Trophy Season - Vinayak Samant (2006-07) - Part 1
रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात यशस्वी ठरलेल्या यष्टीरक्षकांमध्ये विनायक सामंतचे नाव घेतले जाते. मुंबईसाठी खेळायच्या आधी आसामचं प्रतिनिधित्व करूनही सामंतने मुंबई क्रिकेटवर स्वतःची छाप सोडली आहे. 'माझा संस्मरणीय रणजी हंगाम' या मालिकेत पाहूया विनायकच्या २००६-०७ सीझनच्या आठवणी. भाग पहिला

S5 Ep 67IPL media rights simplified, India's mid-series dilemma demystified
इंडियन प्रीमियर लीगच्या प्रक्षेपण हक्कांच्या लिलावाद्वारे नक्की किती पैसे मिळणार BCCI ला? IPL खरंच जागतिक क्रीडाक्षेत्रात महासत्ता बनली आहे? ह्या लिलावामुळे डोमेस्टिक क्रिकेटला कसा फायदा होऊ शकतो? आणि तुमच्या-आमच्या खिशाला जास्त खड्डा पडणार का IPL पाहण्यासाठी? "साप्ताहिक CCBK" मध्ये अमोल कऱ्हाडकर व सुनंदन लेले हे मुद्दे समजावून सांगत तर आहेतच त्याचबरोबर भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचा आढावादेखील घेत आहेत

S6 Ep 36Life in the fast lane: CCBK Special with Snehal Pradhan
पुणे ते मुंबई, क्रिकेटर ते कंमेंटेटर आणि अभ्यासू मुलगी ते यूट्युबर हा प्रवास उलगडत आहे भारताची माजी गोलंदाज स्नेहल प्रधान.

S5 Ep 66Saaptahik CCBK, Importance of India's T20 series versus South Africa; Ranji Trophy QF analysis
भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये कोणत्या मुद्द्यांकडे विशेष लक्ष असेल? त्याचबरोबर 'साप्ताहिक CCBK' मध्ये जाणून घेऊया मुंबईच्या सुवेद पारकरबद्दल ज्याने रणजी ट्रॉफी पदार्पणात स्वतःची छाप सोडली

S6 Ep 35Meet Shams Mulani, the Mumbai allrounder
छोट्या चणीच्या शम्स मुलानीने त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे स्वतःची 'मुंबईचा आधारस्तंभ' अशी ओळख प्राप्त केली आहे. जाणून घेऊया त्याच्या क्रिकेट प्रवासातील विविध टप्पे व त्याच्या मैदानावरील व मैदानाबाहेरील आवडीनिवडी 'CCBK स्पेशल' मध्ये शम्सशी मारलेल्या गप्पांमधून

S5 Ep 65Saaptahik CCBK, The secret of Hardik Pandya's and Gujarat Titans' success in IPL 2022
महिलांचं T२० चॅलेंजमधील घेऊ शकणारे धडे व IPL प्लेऑफ्समधील 'ट्रेंड्स'बरोबरच 'साप्ताहिक CCBK' मध्ये IPL २०२२ ला निरोप देऊया आगळेवेगळे पुरस्कार जाहीर करून.

S5 Ep 64Saaptahik CCBK, India's selection, IPL Playoffs prediction and Women's T20 Challenge resumption
'साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर करत आहेत विश्लेषण भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T२० मालिकेसाठी संघाचं, सांगत आहेत त्यांच्या अपेक्षा विमेन्स T२० चॅलेंजकडून, बांधत आहेत अंदाज IPL विजेत्याचा आणि सांगत आहेत IPL साखळी फेरीतील त्यांच्या दृष्टीने असलेले बहुचर्चित मुद्दे

S7 Ep 17CCBK Explainer: Talking points from IPL 2022's league stage
१० संघ, ५८ दिवस व ७० सामन्यांनंतर इंडियन प्रीमियर लीगचा पहिला टप्पा पार पडला आहे. 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये अमोल कऱ्हाडकर निवडत आहे त्याच्या ५ बहुचर्चित घटना

S7 Ep 16CCBK Explainer: IPL Playoffs format simplified
कशामुळे झालं आयपीएलच्या बाद फेरीचं रूपांतर प्लेऑफ्समध्ये आणि काय आहेत इतर लीग्जमधील शेवटच्या टप्प्याचे प्रकार. जाणून घेऊया 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये अमोल कऱ्हाडकरकडून

S5 Ep 66Rayudu's retirement U-turn and curious case of IPL teams dropping retained players
लिलावाआधी घेतलेल्या खेळाडूंना संघातून वगळण्याची वेळ येणं ह्यातून सूचित होतं IPL संघांच्या बाबतीत. रायडुच्या निवृत्ती-नाट्यावरून त्याची मानसिक अवस्था आणि CSK चा विस्कळीत झालेला संघ हे सर्व अधोरेखित होतं का? करूया चर्चा ह्या मुद्द्यांची 'साप्ताहिक CCBK' मध्ये क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेंबरोबर

S8 Ep 1Impressive Arshdeep, DRS drama and the Virat RCB conundrum
'प्रश्न तुमचे, उत्तरं आमची' ह्या सदराचा आरंभ इंडियन प्रीमियर लीगच्या 'बिझनेस एन्ड' चे औचित्य साधून करत आहोत. CCBK प्रेक्षक व श्रोत्यांचे प्रश्न अमोल कऱ्हाडकरला विचारत आहेत आमचे व्हिडिओ संकलक - एडिटर - सोहम कुरुळकर व तनिष्क मोहिते

S7 Ep 15CCBK Explainer: How have new Indian captains fared in IPL?
IPL २०२२ मधील चार नव्या भारतीय कर्णधारांच्या कामगिरीचा मागोवा घेत आहे अमोल कऱ्हाडकर 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये

S5 Ep 65Should Umran Malik be selected for T20 World Cup?
भारतीय वेगवान गोलंदाजांच्या पुढील पिढीचा म्होरक्या उम्रान मलिक आहे का सज्ज आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी? पाहूया सुनंदन लेलेचं मत. त्याचबरोबर मारूया गप्पा फिनिशरची भूमिका व सेकंड-सीझन सिंड्रोमबद्दल

S7 Ep 14Is age just a number in IPL and T20 cricket?
वाढते वय हे T२०, विशेषतः इंडियन प्रीमियर लीग, खेळण्यासाठी मारक ठरते कि पूरक? पाहूया 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये

S5 Ep 64Rohit Sharma's and Mumbai Indians' woes; Hardik Pandya's and Gujarat Titans' stock grows
मुंबई इंडियन्स पहिल्या विजयासाठी झगडत असल्याची कारणं 'साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेलेंबरोबर शोधायचा प्रयत्न करताना टाकूया एक नजर रोहित शर्माच्या फलंदाजीतील अपयशाकडे. त्याचबरोबर करूया चर्चा रिषभ पंतला झालेल्या शिक्षेबद्दल, अंपायरिंगच्या दर्जाबद्दल आणि गुजरात टायटन्सच्या यशाबद्दल

S7 Ep 13CCBK Explainer: Financial disparity between IPL and other T20 leagues
ऑस्ट्रेलियाचे असो अथवा दक्षिण आफ्रिकेचे, वेस्ट इंडिजचे असो वा श्रीलंकेचे, परदेशी खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी इंडियन प्रीमियर लीगला प्राधान्य देण्याचे किस्से दर वर्षी होत राहतात. टाकूया एक नजर IPL व इतर T२० लीग्जमधील आर्थिक तफावतीकडे

S5 Ep 63Saaptahik CCBK, ft Sunandan Lele: Similarities between IPL ratings and Kohli's form; differences in dealing with COVID-19 scare
IPL २०२२ ला मिळणारा प्रतिसाद आणि कोहलीच्या धावा - दोन्हीला का लागली आहे ओहोटी? आणि कोव्हिडचं सावट कसं हाताळलं आहे आत्तापर्यंत? सुनंदन लेलेंबरोबर ह्या मुद्द्यांवर प्रकाश टाकायचा प्रयत्न करू व मध्यांतराला 'प्लेऑफ्स' मध्ये असू शकणाऱ्या चार संघांचा अंदाजही बांधू

S7 Ep 12CCBK Explainer: How IPL began in 2008
१८ एप्रिल २००८ ला IPL चा पहिला सामना खेळला गेला खरा, पण तुम्हाला माहित आहे कि IPL चा पाया १९९५ पासून नकळतपणे रचला गेला होता? पाहूया IPL ची सुरुवात नक्की कशी झाली अमोल कऱ्हाडकरकडून 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये

S5 Ep 62Saaptahik CCBK, ft Sunandan Lele: Rohit and Virat's mediocre form; will 'retired out' be a new IPL norm?
IPL २०२२ मधील कळीच्या मुद्द्यांबरोबरच 'साप्ताहिक CCBK' मध्ये क्रीडासमीक्षक सुनंदन लेलेंशी करूया चर्चा रोहित शर्मा व विराट कोहलीचे फलंदाजीतील अपयशाचे सावट भारताच्या T२० वर्ल्ड कपच्या संघनिवडीवर असू शकेल का, ह्या प्रश्नावर

S7 Ep 11Increasing importance of a data analyst in T20 cricket
'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये गौरव जोशी समजावून सांगत आहे डेटा ऍनालिस्टची T२० क्रिकेटमधील भूमिका आणि त्यांचे वाढते महत्त्व

S5 Ep 61Saaptahik CCBK, ft Sunandan Lele: CSK on the backfoot, Dinesh Karthik on the rise
क्रीडासमीक्षक सुनंदन लेलेंबरोबर 'साप्ताहिक CCBK' मध्ये पाहूया IPL च्या दुसऱ्या आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडी व करूया चर्चा ऑस्ट्रेलियाच्या महिलांच्या विश्वविजेतेपदाबद्दल

S7 Ep 10Rising stars in IPL 2022
IPL च्या ब्रीदवाक्याला अनुसरून "CCBK एक्स्प्लेनर' मध्ये अमोल कऱ्हाडकर ओळख करून देत आहे तीन भारतीय डोमेस्टिक खेळाडू ज्यांनी IPL २०२२ मध्ये आत्तापर्यंत स्वतःची चुणूक दाखवली आहे

S5 Ep 60Saaptahik CCBK, ft Sunandan Lele: Multan rewind, sensational Shami and time to start Smriti raj?
उपांत्य फेरीत पोहोचण्यात आलेले अपयश हा भारतीय महिला क्रिकेटला किती मोठा धक्का आहे? काय धडे घेता येतील वर्ल्ड कपमधील अपयशातून? मुलतान कसोटी १८ वर्षांपूर्वी याचि देही, याचि डोळा पाहिल्यानंतर त्याबद्दलच्या आठवणी आणि IPL च्या पहिल्या सहा सामन्यांमधील विशेष घडामोडी. क्रिकेटतद्न्य सुनंदन लेलेंशी करूया चर्चा ह्या सर्व मुद्द्यांवर 'साप्ताहिक CCBK' मध्ये

S7 Ep 9IPL २०२२ मध्ये सर्वोत्तम संघ कधी दिसतील?
When will IPL franchisees be able to field their best XI on the park?Description: परदेशी खेळाडू IPL चा अविभाज्य घटक असले तरी काही संघ महत्त्वाच्या परदेशी खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे कमकुवत वाटत आहेत. 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये गौरव जोशी सांगत आहे कोणते खेळाडू उशिरा येणार आहेत ह्या वर्षी

S6 Ep 34IPL Uwaach with Prashant Solanki
उमेदीच्या काळात कौटुंबिक कारणांमुळे दोन वर्षे मुंबई क्रिकेटचा दुरावा, मग करोनाव्हायरसच्या काळात वजन कमी देण्यावर भर, मुंबईच्या २०२१ मधील विजयाचा शिल्पकार, IPL २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा 'नेट बोलर', आणि आता २०२२ IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या करोडपतींपैकी एक. भेटूया ठाणेकर लेगस्पिनर प्रशांत सोळंकीला "IPL उवाच"

S5 Ep 59Saaptahik CCBK ft Sunandan Lele: Talking points of IPL 2022
इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामाआधी वरिष्ठ समीक्षक सुनंदन लेलेंबरोबर करूया चर्चा २०२२ IPL मधील विशेष लक्षवेधी मुद्द्यांकडे, आणि जाणून घेऊया त्यांचे व अमोलचे प्लेऑफ्सचे चार प्रमुख दावेदार कोण आहेत.

S7 Ep 8Four unique aspects of IPL 2022
इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा अध्याय सुरू होण्याआधी पाहूया IPL २०२२ ची चार वैशिष्ट्ये अमोल कऱ्हाडकर कडून 'CCBK एक्स्प्लेनर'

S7 Ep 7Why Indian captains get preference in IPL
प्रशिक्षक भले परदेशी असो, परंतु कर्णधारपदासाठी IPL संघांची भारतीय खेळाडूंना पसंती राहिली आहे. भारतीय कर्णधारांना झुकतं माप मिळण्यामागची कारणे सांगत आहे अमोल कऱ्हाडकर 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये

S7 Ep 6Pros and cons of curtailed Ranji Trophy league stage
दोन वर्षांनंतर पुनरागमन झाले तर खरे परंतु रणजी ट्रॉफी साखळी फेरी अत्यंत छोट्या स्वरूपात खेळली गेली. तीन सामने प्रत्येक संघाला मिळण्याच्या पद्धतीचे विविध कंगोरे अमोल कऱ्हाडकर तुमच्यासमोर मांडत आहे 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये

S7 Ep 5CCBK Explainer: ICC Women's World Cup simplified
काय आहे विमेन्स वर्ल्ड कपचं महत्त्व आणि स्वरूप? माहित आहेत तुम्हाला महिला आणि पुरुषांच्या क्रिकेटमधील नियमांचे फरक? आणि भारताचं काय होऊ शकेल ह्या स्पर्धेत? गौरव जोशी सांगत आहे 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये

S5 Ep 58Saaptahik CCBK, ft Spruha Joshi: Will Kohli be the last Indian in 100-Test Club?
विराट कोहली हा शंभर कसोटी खेळणारा भारताचा १२वा क्रिकेटर व्हायच्या उंबरठ्यावर असताना निवेदिका स्पृहा जोशी विचारत आहे कोहलीबद्दलच्या काही विशेष आठवणी. आणि पाहूया CCBK त्रयीचं महिला विश्वचषक सुरू होताना भारताच्या संघाबद्दलचं 'प्रेडिक्शन'

S5 Ep 57Saaptahik CCBK, ft Spruha Joshi: What is Saha-gate? End of the road for Rahane, Pujara, Ishant?
वृद्धिमान साहाला खरंच धमकी दिली पत्रकाराने? आणि साहाने प्रकरणावर पडदा पाडायचं का ठरवलं असावं? हे 'ट्रेंडिंग' प्रश्न स्पृहा जोशी विचारतेच, त्याचबरोबर ती चर्चा घडवून आणते रोहित शर्माचं कर्णधारपद, मातब्बर खेळाडूंना कसोटी संघातून मिळालेला डच्चू, श्रीलंका मालिकेतील महत्त्वाचे मुद्दे, रणजी ट्रॉफीमधील उगवते तारे आणि अर्थात महिला क्रिकेटविषयी सुद्धा.

S7 Ep 4CCBK Explainer: Modus operandi of age-fudging in cricket
एखाद्या खेळाडूवर वय चोरण्याचे आरोप होणे हे काही भारतीय क्रीडाक्षेत्राला, विशेषतः क्रिकेटला, नवीन नाही. समजून घेण्याचा प्रयत्न करू वय कमी का करावंसं वाटते, ते कसं जमू शकते आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात

S6 Ep 33Rahul Tripathi remembers IPL debut: Dhoni’s calming effect and Rahane’s help
राहुल त्रिपाठी हे नाव प्रत्येक IPL प्रेमीला माहित आहेच. त्याचे महत्त्व त्याला IPL लिलावात सनरायझर्स हैदराबादने तब्बल ८.५ कोटी रुपयांच्या बोलीत सिद्ध होतेच. काय आहेत पुणेकर राहुलच्या २०१७ मधील त्याच्या IPL पदार्पणाच्या आठवणी, जेव्हा तो रायजिंग पुणे सुपरजायंट्समध्ये होता. lm5epaz0J2MHZOex14Nn

S5 Ep 56Saaptahik CCBK ft Spruha Joshi: Why Suresh Raina went unsold in IPL Auction
को-होस्ट स्पृहा जोशी विचारत आहे सर्वांना पडलेला प्रश्न: IPL लिलावामध्ये सुरेश रैनाला का नाही लागली बोली? आणि कुठला संघ सर्वात समतोल वाटत आहे कागदावर. त्याचबरोबर महिला क्रिकेटबद्दल विशेष सेगमेंट नक्की बघा

S7 Ep 3Why six pacers joined the 10-crore club in IPL Auction
IPL लिलावामध्ये तेजगती गोलंदाजांसाठी का झाली सर्व संघांमध्ये चढाओढ? आणि काय विचार केला असेल संघ व्यवस्थापनांनी परदेशी खेळाडू निवडताना? पाहूया गौरव जोशीचं विश्लेषण

S7 Ep 2CCBK Explainer: IPL Auction simplified
सर्वात भव्य IPL लिलाव काही तासांवर येऊन ठेपला आहे. पाहूया ऑक्शनचं गणित असतं तरी कसं आणि मांडूया प्रत्येक संघाचा ताळेबंद

S5 Ep 55Latadidi, the cricket fan; Under-19 World Cup triumph and IPL Auction
नवीन अँकर स्पृहा जोशीबरोबर वाहूया श्रद्धांजली भारतरत्न लता मंगेशकरांना त्यांच्या क्रिकेटप्रेमाच्या आठवणींना उजाळा देऊन. त्याचबरोबर पाहूया अंडर-१९ विश्वविजेत्या संघातील खेळाडूंसाठी पुढे असलेली आव्हाने, IPL लिलावाकडे टाकूया एक नजर, रणजी ट्रॉफीच्या पुनरागमनाचे जाणून घेऊया महत्त्व व चर्चा करूया वॉशिंग्टन सुंदर अष्टपैलू खेळाडूची भरून काढू शकेल का कसर ह्या मुद्द्यावर

S7 Ep 1Why quick legspinners are in demand in T20 cricket
रवी बिश्नोईची भारतीय संघात निवड, बिश्नोई व रशीद खानसाठी दोन नव्या IPL संघांमध्ये चढाओढ. आणि कायम त्यांच्यासारख्या नव्या गालंदाजांचा शोध? गौरव जोशी सांगत आहे 'जलद लेगस्पिनर्स' का महत्त्वाचे ठरतात T२० क्रिकेटमध्ये

S6 Ep 32The making of "Osmanabad Express" Rajvardhan Hangargekar
तुळजापूरमधून क्रिकेट खेळायला सुरूवात करून भारताच्या अंडर-१९ संघामध्ये "उस्मानाबाद एक्स्प्रेस" असा नावारूपाला आलेल्या राजवर्धन हंगर्गेकरच्या प्रवासाचे साक्षीदार तेजस मातापूरकर, जे त्याचे मार्गदर्शक आहेत, उलगडत आहेत राजवर्धनचा प्रवास

S6 Ep 31Cricketcha Keeda Ft. Spruha Joshi
सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीजपर्यंत क्रिकेट आवडणे व त्यावर चोखंदळपणे गप्पा मारणे हा सर्व भारतीयांचा छंद आहे. सादर करत आहोत एक नवी मालिका 'क्रिकेटचा किडा' ज्यात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांच्या क्रिकेटप्रेमाबद्दल गप्पा मारणार आहोत. मालिकेची सुरूवात करूया एका अशा अभिनेत्रीपासून जी एक हळवी कवयित्रीसुद्धा आहे. ओव्हर टू स्पृहा जोशी

S5 Ep 54Why India lost so badly in ODIs
If you did not anticipate India's whitewash in the three-match ODI series in South Africa, we present to you the main reasons for the forgettable week at the end of the tour. We also discuss the fate of the Under-19 team in the World Cup and the women's team's fate during the long tour to New Zealand. And don't forget the teaser about the Republic Day special.

S5 Ep 53Who should be India's next Test captain?
With Virat Kohli having stepped down as Test captain, his successor is a hot-topic across the cricketing globe. Amol Karhadkar presents his five contenders for the coveted post.

S5 Ep 52Kohli conundrum to overshadow ODI series in South Africa
He may no longer be India's captain in any format but having resigned as Test captain barely a few hours earlier, Virat Kohli will definitely be in the limelight during India's ODI series in South Africa. We discuss what's next for Kohli and present you India's possible starting XI on January 19तो भले भारताचा कर्णधार नसेल परंतु काहीच तासांपुर्वी कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली नक्कीच ODI सिरिजमध्ये प्रकाशझोतात राहील. कोहलीचं पुढे काय होणार ही चर्चा करतानाच एकीकडे आम्ही १९ जानेवारीला पहिल्या सामन्यात भारताचा संभाव्य संघसुद्धा सांगत आहोत

S5 Ep 52Why England lost the Ashes so badly
Lack of planning? Or overplanning? And why aren't England able to produce quality batters in county cricket? CCBK's very own Australian Gaurav Joshi explains after England are mauled 4-0 in the Ashes