PLAY PODCASTS
तू माझा यजमान रामा आणि हि राम नाम नौका भवसागरी तराया (भैरवी)

तू माझा यजमान रामा आणि हि राम नाम नौका भवसागरी तराया (भैरवी)

रामकुटी (Ramkuti)

December 28, 20223m 47s

Audio is streamed directly from the publisher (play.hubhopper.com) as published in their RSS feed. Play Podcasts does not host this file. Rights-holders can request removal through the copyright & takedown page.

Show Notes

89 वर्षाच्या (श्रीमती सुमन दत्तात्रय घाटे ) आजी यांनी म्हटलेले सुंदर भजन आणि भैरवी.

तू माझा यजमान रामा,

तू माझा यजमान ||धृ||

जननी जठरी रक्षियले मज,

पोसुनी पंचहि प्राण ||१||

बाहेर निघता मातेचे स्तनी,

पय केले निर्माण ||२||

ऐसे असता या पोटाची,

का करू चिंता जाण ||३||

मध्व मुनीश्वर स्वामी रमापती,

धरी माझा अभिमान ||४||


आणि


ही रामनाम नौका | भवसागरी तराया ||

मद, मोह लोभ सुसरी | किती डंखिती विषारी |

ते दुःख शांतवाया | मांत्रिक रामराया ||

सुटले अफाट वारे | मनतारू त्यात बिथरे |

त्या वादळातुनी या नेईल रामराया ||

भ्रम भोवऱ्यात अडली | नौका परी न बुडली |

धरुनी सुकाणू हाती | बसलेत रामराया ||

आम्ही सर्वही प्रवासी | जाणार दूरदेशी |

तो मार्ग दाखवाया | अधिकारी रामराया ||

हा देह नाशिवंत | जाण्यास ना समर्थ |

तारी तारी रामराया | दीनदास लागे पाया ||