PLAY PODCASTS
राम आरती स्वर आणि रचना आरती सदरजोशी

राम आरती स्वर आणि रचना आरती सदरजोशी

रामकुटी (Ramkuti)

September 23, 20232m 31s

Show Notes

*रामनवमी निमित्त स्वरचित कविता- आरती सदरजोशी*

राम तो तारक। जोडी सोयरीक।
आवरी घातक। सुख ते ऐहीक।१।

रामनाम गाता। रामरूप झाले।
तुझसी सर्वथा । एकरूप झाले।२।

तुझिया नामाचा। लागलासे छंद।
तुझिया भक्तीचा। अविट आनंद।३।

नाही खेद मोद। होता निंदा स्तुति।
राहीली अभेद। माझी आत्मस्थिती।४।

राघव श्रीराम। भक्तांचा कैवारी।
जन्मजन्मांतरी। बैसला अंतरी।५।

तुझिया स्वाधिन। झाले मी संपूर्ण।
काया वाचा मन। तुझसी अर्पण।६।