PLAY PODCASTS

Ask Pastor John

Alethia4India

3 episodesEN-US

Show overview

Ask Pastor John has published 3 episodes during 2024. Releases follow a monthly cadence.

Episodes typically run ten to twenty minutes — most land between 7 min and 12 min — though episode length varies meaningfully from one episode to the next.

The catalogue appears to be on hiatus or wound down — the most recent episode landed 1.8 years ago, with no new episodes in over a year. Published by Alethia4India.

Episodes
3
Started
2024
Median length
11 min
Cadence
Monthly

Latest Episodes

Episode #3: मंडळीला अनौपचारिक संस्कृतीतून बाहेर आणणे.

मंडळीला अनौपचारिक संस्कृतीतून बाहेर आणणे. पुन्हा एकदा पास्टर जॉन यांना विचार या मराठी पोडकास्ट मध्ये तुमचेस्वागत आहे,    आम्ही “गोंधळ” म्हटल्या गेलेल्या ऑनलाईन वादामध्ये परत आलेलो आहोत. पास्टर जॉन आपण 30 सप्टेंबर रोजी कॉफी बाबत ट्वीट केले. आणि तुम्ही इब्री 12:28 पोस्ट केले जे असे म्हणते, “देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू.” आणि ह्या आदर व भययुक्त आराधनेच्या दृष्टांताच्या प्रकाशात आपण हा खुला प्रश्न मांडला: “रविवारी भक्तिमंदिरात कॉफी पिणे योग्य आहे का, ह्या बाबत पुनर्विचार करता येईल का?” मी मागेच सांगितल्याप्रमाणे, ह्या ट्वीटला पसंत करण्यात आले आणि नापसंतही करण्यात आले आणि ती इंटरनेटवर इतकी पसरली की काही आठवड्यातच तिला 1000 ट्वीट्स, 1500 कॉमेंट्स, 3000 लाईक्स, 2.5 दशलक्ष व्ह्यूज, आणि अमेरिकेतील फॉक्स न्युजद्वारे आणि युके मधील डेली मेल द्वारे ऑनलाईन विशेष लेख प्राप्त झाले. आता त्या ट्वीटमागे भरपूर काही आहे, खरेतर पूर्ण जगिक दृष्टिकोण. म्हणून आम्ही त्यामागील संदर्भ उभारत आहोत, आणि तुम्ही रविवारी सकाळी जे सर्व घडते त्यामध्ये मंडळीला ह्या आदरयुक्त अनुभूतीने कसे आकार देऊन उभारता येईल ह्याबाबत बोलत आहात. मागील वेळी तुम्ही असे दर्शविले की तुम्ही मंडळीच्या पुढार्‍यांना मंडळीला अनौपचारिक भक्ती पासून इब्री लोकांस पत्र आणि पवित्र शास्त्र पाचारते त्या अधिक उत्तम आणि योग्य अशा भक्तिप्रत घेऊन जाण्याचे वास्तविक महत्व काय ह्या विषयात प्रवेश करू इच्छिता. म्हणून वास्तविक व्हा, आणि आम्हाकरिता ह्या मुद्दयावर आपली चर्चा हाती घ्या. मी मागच्यावेळी युक्तिवाद मांडला की मंडळीतील आराधनेच्या पवित्र वेळी कॉफी पिणे हे इब्री. 12:28 मध्ये अपेक्षित आदर व भयाशी सुसंगत नाही. कारण इब्री लोकांस पत्र म्हणते, “देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू.” परंतु मी युक्तिवाद केला की कॉफी पिणे हा मध्यवर्ती मुद्दा नाही. मध्यवर्ती मुद्दा हा आहे की रविवारी सकाळच्या मंडळीच्या आराधनेच्या तासाची पवित्रता ज्याला मी “आदर आणि भय” आणि पावित्रता म्हणतो, ती प्रतिध्वनित करणारी हृदये लोक आणि पुढारी बाळगत नाहीत. त्या वास्तविकता, त्या आदरयुक्त वास्तविकता त्यांच्या मनात आणि हृदयात प्रमुख नाहीत. त्यांना आदर, भय हे शब्द माहित आहेत. त्यांना शब्द माहित आहेत, परंतु त्या शब्दांमध्ये सक्तिचा अस्तित्ववादी मान नाही, लोकांना आदर आणि भयाची ओढ लावणारा गंभीर आनंद नाही. ते केवळ शब्द आहेत. आणि मी युक्तिवाद केला की तुम्ही बाह्यात्कारी नियम बनवून ही समस्या सोडवू शकत नाही. अंतर्गत, हृदयस्पर्षी आदर जागृत करून ही समस्या सोडविली जाऊ शकेल. म्हणजे, ज्या गोष्टी सुसंगत नाहीत त्या बहिष्कृत होत नाहीत; त्या आपोआपच गळून जातात. मला असे वाटते मी त्याप्रमाणेच ते करण्याचा प्रयत्न केला आहे. मी 33 वर्षाच्या माझ्या उपदेशांमध्ये कधीच असे नियम मांडले नाहीत. मला ह्या ठिकाणी पुढील पाच ते दहा वर्षांमध्ये पाळक लोकांना मंडळीला क्रमश: पुढे चालविण्याचा वास्तविक मार्ग दाखवायला आवडेल.  आपण अनौपचारिक, स्वस्त, कॉफीचे घोट घेणार्‍या, मनोरंजन केंद्रित सामुहिक सभांपासून देवाच्या अधिक गांभिर्ययुक्त आनंदी, आदरयुक्त, सखोल समाधानकारी भेटीकडे जाण्यास संयम बाळगला पाहिजे.  म्हणून, टोनी, ह्या एपिसोडमध्ये आपण काही मिनिटे अशा उपदेशांबद्दल बोलू शकतो जे त्या दिशेने आपणास चालवू शकतील. देवाप्रत असणारी वृत्ती विकसित करणे परंतु ते म्हणण्यापूर्वी, पाळकाची एकून वृत्ती अशी असावी की आठवड्यातून तास-दिड तास देवाचे लोक त्यांच्यासोबत अशा क्रांतिकारी देवाप्रत असणार्‍या मनाने भेटतील ज्यामध्ये भारदस्तपणा आणि गांभीर्य आहे, आणि तो देवकेंद्रितेचा भारदस्तपणा आणि गांभीर्य हे आमच्या लोकांच्या जिवनांमध्ये सर्वात समाधानकारक अनुभव व्हावा. आम्हाला अशी वृत्ती असावयास हवी : “मला हे असे करायचे आहे की त्यांना ते आवडेल, त्यांना ते पाहिजे असेल, ह्याकरिताच ते येतील. “आता हे सहन करावे लागणार असे नाही तर ह्याची अपेक्षा केली जाईल.” अशी वृत्ती त्यांच्या ठायी निर्माण व्हावी. आपण जगापेक्षा जास्त मनोरंजन कधीच करू शकणार नाही. हे मला ह्या ठिकाणी शिक्कामोर्तब करू द्या. आपण जगापेक्षा जास्त मनोरंजन कधीच करू शकणार नाही, आणि आपण त्याचा प्रयत्नही करू नये, कारण आमच्याजवळ त्याच्यापेक्षा अमर्यादरीत्या उत्तम काहीतरी आहे, असे की ज्याकरिता आमचे आत्मे निर्माण केलेले आहे. आणि आमच्या बहुतांश लोकांना हे माहित नाही. व्हीडीओज बघणे आणि इतर मनोरंजनाच्या मजेशीर साधनांपेक्षा अधिक उत्तम काय आहे हे त्यांना माहित नाही. त्यांना हे माहितच नाही. त्यांनी खर्‍या गोष्टीचा कधी स्वादच घेतलेला नाही. असे काहीतरी जे आमच्या अंतर्यामी सर्वांगीणरीत्या स्थैर्य देणारे, शक्ती देणारे, शुद्ध करणारे, आणि समाधान देणारे जे आहे त्याची ओढ लोकांना असते, आणि त्यांना कशाची ओढ आहे हे त्यांना ते वारंवार दाखविल्याशिवाय समजणार नाही. म्हणूनच उपदेशाच्या संदर्भात पाळकांना ह्या पाच विनंत्या आहेत. 1. पवित्र शास्त्राचे लोक उभारा लोकांचे लक्ष पवित्र शास्त्रावर, त्याच्या शब्दांवर खिळवा. महान वास्तविकता हाताळा, आणि त्यांना त्या वास्तविकता पवित्र शास्त्रभागांमधून दाखवा. पवित्र शास्त्रावर भरवसा निर्माण करा. पवित्र शास्त्राचा व्यक्ती म्हणून तुमच्यामध्ये भरवसा निर्माण करा, जेणेकरून लोक म्हणतील, “आपण त्याच्यावर भरवसा ठेऊ शकतो कारण तो पवित्र शास्त्राचा माणूस आहे.” ह्या भुमिकेमुळे काही लोक मंडळी सोडून जातील; पवित्र शास्त्राला अशा प्रकारे अधीन होणे हे जास्तच भीतिदायक आणि धाकात ठेवणारे आहे.  इतर ह्यासाठी भुकेले आहेत, आणि ते घरी जातील. कालंतराने, लोकांना असे घडविण्याचा प्रयत्न करा की ज्यांची मनोवृत्ती आत्मजागृतीने आणि आनंदाने पवित्र शास्त्राच्या अधिकाराच्या अधीन आहे.  असे लोक घडविण्याचा प्रयत्न करा जे पवित्र शास्त्रा आधारे सर्व बाबींचे मुल्यमापन करतील. प्रत्येक विचार, प्रत

Nov 26, 20242 min

Episode #2: माझे अंतःकरण कठीण आहे का ?

“We avoid getting a hard heart by being in a healthy community of believers who exhort us every day.” February 1, 2024 पास्टर जॉन यांना विचारा या मराठी पोडकास्ट मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वाचे स्वागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आत्म-संशयाच्या संघर्षात असलेल्या श्रोत्यांकडून येणारे बरेच प्रश्न आम्ही हाताळले आहेत- याबद्दल की ते खरंच विश्वासात आहेत कि नाही असा प्रश्न; त्यांनी अक्षम्य पाप केले आहे का हे विचारणे; ते विश्वासात आहेत कि मागे गेले आहेत, ते देवाने निवडलेल्यांपैकी एक आहेत का हे विचारणे. यासारखे बरेच विचारशील, भयभीत, आत्मचिंतन करणारे प्रश्न आम्हाला ईमेलमध्ये नेहमीच येतात. आज अहरोनच्या प्रश्नात हे खरे आहे. “सलाम, पास्टर जॉन! मी प्रथम सांगू इच्छितो की तुम्ही माझ्यासाठी खरोखरच आशीर्वादित आहात. मी तुमच्यासाठी देवाचे आभार मानतो. माझे अलीकडेच प्रभूसोबत अधिक चांगले नाते जोडण्यास सुरुवात झाली आहे. नवीन करारात मला ‘कठोर अंतःकरणाविषयी’ चा वाक्प्रचार अनेकदा आढळतो. माझा प्रश्न असा आहे:  देवाविरुद्ध माझे मन कठोर झाले आहे हे मला कसे कळेल? याचा अर्थ काय? आणि देवाप्रती माझे मन कठोर होणार नाही याची मी खात्री कशी करू शकतो?” पास्टर जॉन प्रथम आपण पवित्र शास्त्रातील "हृदयाची कठोरता" या संकल्पनेचा सामान्य अर्थ समजून घेऊया. त्यानंतर आपण देवाशी संबंधित ख्रिस्ती दृष्टिकोनातून "हृदयाची कठोरता" काय आहे आणि त्यापासून दूर राहण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा करूया भावनाशुन्य हृदय कठोर हृदयाचा सर्वात सामान्य अर्थ म्हणजे असे हृदय ज्यामध्ये कोमलता आणि करुणेचा अभाव असणे – उदाहरणार्थ, गरीबांबद्दल दया. (अनुवाद 15:7-8) "जर  . . . तुमचा एक भाऊ गरीब झाला असेल तर  . . तुम्ही तुमचे हृदय कठोर करू नका. . . पण तुमच्या गरीब भावासाठी, तुमचा हात आखडू नका ” "आम्हाला दररोज प्रोत्साहन देणाऱ्या विश्वासणार्यांच्या निरोगी समुदायात राहून आपण कठोर हृदय मिळवणे टाळतो". केवळ गरीबांबद्दलच सहानुभूती असणे असे नाही, तर आजारी किंवा अपंगांसाठी देखील दया असणे. मार्क 3 मध्ये, येशू सभास्थानात हात वाळलेल्या एका माणसाला पाहतो आणि त्याला बरे करतो.  मग तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, ह्यांतून कोणते सशास्त्र आहे?” पण ते उगेच राहिले (मार्क 3:4). इथे ह्या प्रश्नाचे उत्तर देणे काही कठीण नव्हते, बरोबर? जीव वाचवायचा की मारायचा? पण ते गप्प बसले. आणि वचन असे सांगते कि  “मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले” (मार्क 3:5). म्हणून, "हृदयाची कठोरता" ह्याचा सर्वात सामान्य अर्थ म्हणजे असे हृदय आहे ज्याला इतरांच्या दुःखा प्रती भावना, सहानुभूती, कळवळा वाटत नाही. हे हृदय ज्याला काहीहि वाटत नाही, जाणवू शकत नाही ते दगडासारखे आहे.  तर, जोनाथन एडवर्ड्स, यांच्या 'रिलिजियस अफेक्शन्स' या पुस्तकात जे लिहिले आहे ते तुम्हीं वाचावे अशी मी शिफारस करतो; माझ्या आयुष्यातील एका विशिष्ट टप्प्यावर सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ते माझ्यासाठी  सामर्थ्यवान होते — अनेक शास्त्रभागांचे अध्ययन केल्यावर, हृदयाच्या कठोरपणाची व्याख्या ते अशी करतात,  “कठोर हृदय म्हणजे अप्रभावित हृदय किंवा सद्गुणांच्या भावनांनी सहजासहजी प्रभावित होऊ न शकणारे किंवा दगडासारखे, संवेदनाहीन, मूर्ख, गतिहीन आणि अप्रभावित असे हृदय, ही एडवर्ड्सची व्याख्या आहे. पश्चात्ताप न करणारे हृदय “पवित्र शास्त्रामध्ये हीच वास्तविकता आपल्याला दिसते, ज्यामध्ये सुरुवातीला गरीब आणि अपंग लोकांबद्दल सहानुभूती नसणे यापासून ते पुढे जाऊन देवाच्या आवाजाला प्रतिसाद न देणे या स्तरावर पोहोचते. कठोर हृदय देवाचे ऐकण्यास, पश्चात्ताप करून देवाकडे वळण्यास नकार देते. सिदकिया बद्दल पवित्र शास्त्र सांगते की, “त्याने आपली मान ताठ केली, आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे तो वळला नाही, त्याने आपले मन कठीण केले.” (2 इतिहास 36:13). दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर त्याला पश्चात्ताप करण्याची आणि परमेश्वराकडे वळण्याची इच्छा वाटली नाही. त्याच्या जीवनात सत्य बोलण्यासाठी संदेष्ट्यानी केलेल्या सर्व प्रयत्नांना तो दगडासारखा अविचारी, प्रतिसाद न देणारा झाला. रोमकरांस पत्र 2:4-5 मध्ये आपण ते अधिक सामान्यपणे पाहतो: “देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? की, आपल्या हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरिता क्रोध साठवून ठेवतोस?" पॉल म्हणतो, देवाचा दयाळूपणा, संयम, सहनशीलता, ह्यामुळे आपले हृदय कृतज्ञता, नम्रता व पश्चात्तापाने वितळले पाहिजे त्याऐवजी ते पाषाणासारखे कठीण निरुत्तर, निश्चल, कृतघ्न, गर्विष्ठ, उद्धट असे हृदय बनले आहे. जेव्हा जखऱ्या संदेष्ट्याद्वारे प्रभूचे वचन लोकांपर्यंत पोहोचले, तेव्हा ते असे म्हणाले," सेनाधीश परमेश्वराने आपल्या आत्म्याच्या द्वारे पाठवलेले नियमशास्त्र व वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपले मन पाषाणासारखे कठीण केले"; (जखऱ्या ७:१२). म्हणून, पवित्रशास्त्रामधील हृदयाची कठोरता हे पाषाणासारखे हृदय असणे असे आहे कारण ते कधीकधी मानवी दुःखांना न समजणारे, अचल, भावनाशून्य, प्रतिसादहीन असते, , परंतु, सर्वात वाईट म्हणजे देवाच्या वचनाबद्दल, देवाच्या दयेबद्दल आणि देवाच्या सुवार्तेबद्दल निरुत्साही, अचल, भावना नसलेले असे आहे.  देवाच्या दयेचा उबदारपणा  त्यावर चमकतो तरी ते वितळत नाही. देवाची कृपा त्यावर ओतली  जाते तरी, ते मऊ होत नाही. हिऱ्यासारखे कठोर हृदय असल्याने तो देवाचा प्रतिकार करतो. पाषाणाला मांसमय बनवले. तर, आपण विचारतो, कठोर हृदयापासून कसे मुक्त होऊ शकतो किंवा ते होऊ न देण्यासाठी काय करावे? कठोर हृदयापासून मुक्त होणे हे निर्णायक आहे, पवित्रशास्त्र&nbsp

Oct 10, 202410 min

Episode #1: लपवून ठेवलेले पाप शारीरिक वेदना देतात का?

We should take the Psalms seriously when they picture physical ailments as sometimes owing to unconfessed sin.

Oct 6, 202412 min
© 2024 Alethia4India